agro agriculture news marathi ; 'Focus on buying commodities' | Agrowon

शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या : शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व पपई ही महत्त्वाची नगदी पिके आहेत. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, ते शेतकरी या पिकांच्या माध्यमातून आपले अर्थचक्र चालवितात. परंतु, यंदा या तिन्ही पिकांचे दर टिकून आहेत. कांद्याचे दर विक्रमी स्थितीत आहेत. यामुळे या पिकांच्या शिवार किंवा खेडा खरेदीकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व पपई ही महत्त्वाची नगदी पिके आहेत. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, ते शेतकरी या पिकांच्या माध्यमातून आपले अर्थचक्र चालवितात. परंतु, यंदा या तिन्ही पिकांचे दर टिकून आहेत. कांद्याचे दर विक्रमी स्थितीत आहेत. यामुळे या पिकांच्या शिवार किंवा खेडा खरेदीकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिवार खरेदीकडे बाजार समित्यांचे लक्ष नसल्याने दर कमी देण्याचे प्रकारही होतात. पपई, कांद्याचे दर रोज खरेदीपूर्वी जाहीर होत नाहीत. केळीचे दर खरेदीपूर्वी रोज जाहीर केले जातात. मग या दरात केळीची खरेदी केली जाते. केळीचे दर रोज जाहीर होतात. तसे दर शिवार खरेदीसंबंधी कांदा व पपईबाबत जाहीर केले जात नसल्याने व्यापारी सांगतील, त्या दरात खरेदी केली जाते. यात केळीचे जे दर जाहीर होतात, त्या दरात सध्या खरेदी केली जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. क्विंटलमागे १०० ते १५० रुपये कमी दर जाहीर दरांपेक्षा केळीच्या शिवार खरेदीमध्ये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. 

यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. परंतु, बाजार समित्या कारवाई करीत नाहीत. कुठेही भरारी पथके नाहीत. केळी, पपई व कांद्याचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, जळगाव, जामनेर व पाचोरा या भागांत अधिक घेतले जाते. तर धुळ्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमध्ये तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागात केळी, कांदा व पपईचे पीक अधिक असते. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधील खरेदीदारांचे एजंट सर्रास खरेदी करतात. बाजार समितीचे शुल्क बुडविले जाते. अनेकदा खरेदी करून एजंट पोबारा करतात. अनेक शेतकऱ्यांची वित्तीय लूट, फसवणूक मागील चार-पाच वर्षांत रावेर, यावल, शहादा, शिरपूर, धुळे, जामनेर, जळगाव भागांत झाली आहे. परंतु, फसवणूक करणाऱ्यांवर बाजार समित्या, पोलिसांनी कारवाई केलेली नाही. यामुळे शिवार खरेदीवर लक्ष असावे. भरारी पथकांची नियुक्ती प्रमुख बाजार समित्यांनी करावी, अशी मागणी शेतकरी दीपक पाटील (चोपडा) यांनी केली आहे.


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...