agro agriculture news marathi ; The implementation of 'Waghad' procedure will be implemented in Nigeria | Agrowon

नायजेरियात होणार ‘वाघाड’च्या कार्यपद्धतीचा अवलंब

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक  : पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संघाने जल व्यवस्थापन व जलवितरणाच्या माध्यमातून आदर्श पाणीवापर संस्थांचा समूह म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. याच संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे व कामकाज समजून घेण्यासाठी नायजेरिया सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाच्या उच्च पदस्थ शिष्टमंडळाने वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या कामकाजासह सर्व पाणी वितरण प्रणालीची पाहणी केली. आगामी काळात नायजेरिया सरकार ‘वाघाड’ प्रकल्पस्तरीय पाणीवापर कार्यपद्धतीचा अवलंब करणार आहे. 

नाशिक  : पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संघाने जल व्यवस्थापन व जलवितरणाच्या माध्यमातून आदर्श पाणीवापर संस्थांचा समूह म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. याच संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे व कामकाज समजून घेण्यासाठी नायजेरिया सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाच्या उच्च पदस्थ शिष्टमंडळाने वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या कामकाजासह सर्व पाणी वितरण प्रणालीची पाहणी केली. आगामी काळात नायजेरिया सरकार ‘वाघाड’ प्रकल्पस्तरीय पाणीवापर कार्यपद्धतीचा अवलंब करणार आहे. 

नायजेरिया सरकारच्या शिष्टमंडळाने वाघाड प्रकल्प स्तरीय संस्थेस भेट देऊन सहभागी सिंचन व्यवस्थापनातील बारकावे समजून घेतले. नायजेरिया सरकारने सिंचन प्रकल्पांची आखणी केली आहे. यासाठी जागतिक बँकेने अर्थसाह्य घेऊन विकासकामे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प लाभार्थ्यांकडे सहभागी सिंचन व्यवस्थापन करुन हस्तांतरित करण्यापूर्वी कामकाजाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नायजेरिया सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाच्या शेतीसिंचन व्यवस्थापन विभागाचे संचालक इलिजाह आडेरेब्रिज, राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पाचे समन्वयक पॅलिस मंज्युक यांच्यासह शिष्टमंडळाने वाघाड प्रकल्पास भेट दिली.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने सह्याद्री फाॕर्म येथे वाघाड प्रकल्पाचे सादरीकरण इंजिनिअर शुभम भालके यांनी केले. या वेळी पाणीवापर संस्था, महाराष्ट्र शासन व समाज परिवर्तन संस्था यांची भूमिका विशद केली. सिंचन व्यवस्थापनातून झालेले कामाचे नियोजन व व्यवस्थापन, कामकाज करण्यासाठी उपलब्ध यंत्रणा व पाण्याचा वाढलेला अधिक कार्यक्षम वापर यामुळे शिष्टमंडाळातील सदस्य प्रभावित झाले. गोवर्धन कुलकर्णी यांनी सादरीकण केले. संस्थेचे माजी अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनीही त्यांचे अनुभव सांगितले.

शिष्टमंडळाने वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. या वेळी समाज परिवर्तन केंद्राने इंग्रजीत भाषांतरित केलेला संस्थेचा वार्षिक अहवाल वितरण संस्थेचे सचिव श्री. कदम यांनी केले. 

पाणीवापर संस्थेचे सल्लागार माजी अभियंता लक्ष्मीकांत वाघावकर यांनी वाघाड संस्थेच्या यशस्वी व नियोजनबद्ध कामाची तांत्रिक माहिती दिली. 


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...