नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
ताज्या घडामोडी
लाल कांद्याच्या दरात सुधारणा
नाशिक : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची होत असणारी बाजार समित्यांमधील आवक अजूनही मागणीच्या तुलनेत नाही. अजूनही ही आवक कमी आहे. त्यामुळे दर दहा हजारच्या वर गेले होते. कांदा आयात, कांद्यातील ओलावा व प्रतवारीचे कारण पुढे मात्र, चालू सप्ताहाच्या सुरुवातीस हे दर चार हजारांपर्यंत गडगडले होते. मात्र पुन्हा आवकेची स्थिती जेमतेम असल्याने दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सप्ताहाखेर सर्वसाधारण दरात २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दरात सुधारणा झाली आहे.

सप्ताहाच्या सुरुवातीला लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल ४७०० दर होता, तर सप्ताहअखेर शुक्रवार (ता. १३) पर्यंत दरात पुन्हा सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार (ता. १४) लाल कांद्याला सर्वसाधारण प्रतिक्विंटल दर मनमाड ६२००, नामपूर ७५००, पिंपळगाव बसवंत ७२०१, असे दर मिळाले. तर लासलगाव, उमराणे बाजार समितीचे कामकाज बंद होते.
नवीन खरीप कांदा उशिराने लागवडी झाल्याने बाजारात येणारा कांद्याची आवक अजूनही कमीच आहे. दैनंदिन होणारा पुरवठा करताना व्यापारी वर्गाची अडचण होत आहे. त्यात साठवणुकीची अडचण असल्याने मालाची निकासी वेळेवर करावी लागत आहे. त्यामुळे बाजारभाव पुन्हा उसळल्याचे बाजारात चित्र आहे.
कांदा दरातील सुधारणा (दर सरासरी)
बाजार समिती |
९ डिसेंबर |
१३ डिसेंबर |
दरात वाढ |
लासलगाव | ४७०० | ७३०० | २५०० |
पिंपळगाव बसवंत | ५२५१ | ७१५१ | १९०० |
उमराणे | ५०५० | ७००० | १९५० |
मनमाड | ४३५० | ६२०० | १८५० |
देवळा | ३५०० | ५५०० | २००० |
नाशिकच्या कांद्याबरोबर राजस्थान व गुजरात राज्यातून देशभरात होणारा पुरवठा मंदावला आहे. त्याचा परिणाम म्हणून दरात वाढ झाली.
- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव, ता. निफाडशेतकऱ्यांकडून आणलेला माल कमी येत आहे. एकरी उत्पादन कमी आहे. त्यात आवक व गुणवत्ता नसल्याने दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
- सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड
- 1 of 1024
- ››