जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता

जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता
जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्‍यता

जळगाव ः राज्यातील महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्जमाफीची घोषणा आज केली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्हा बॅंकेचा विचार करता १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सुमारे ९०० कोटी निधी अपेक्षित आहे.  भाजप शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केवळ जिल्हा बॅंकेचा विचार केला, तर बॅंकेच्या ३ लाख ७१ हजार ९७६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. कर्जमाफी झाल्यानंतरही १ लाख ५५ हजार सहा शेतकऱ्यांकडे ९०१ कोटी ५८ लाख ६४ हजारांची थकबाकी आहे. या व्यतिरिक्त इतर राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या शेतकऱ्यांकडील कर्जमाफीची रक्कम जवळपास तितकीच आहे. भाजप शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. अगोदर संपूर्ण कर्जमाफी, नंतर ठरावीक वर्षातीलच कर्जमाफी, नंतर विविध अटींसह कर्जमाफी, शेवटी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, असे नियम लावले गेले. यामुळे अनेक शेतकरी नियमात न बसल्याने ते कर्जमाफीपासून वंचित राहिले. काहींकडे पाच लाखांचे कर्ज असेल, तर त्यांना अगोदर साडेतीन लाख रुपये भरावे लागणार होते; नंतरच त्यांना दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कर्ज न भरण्याकडे कल दिसला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हा बॅंकेपुरता विचार केल्यास १ लाख ५५ हजार सहा शेतकऱ्यांकडे ९०१ कोटीचे कर्ज येणे बाकी आहे. जिल्ह्यात दोन लाखांची कर्जमाफी सुमारे एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक विभागाने माहिती मागविणे सुरू केले आहे.  कर्जमाफीसंबंधीची माहिती

भाजप काळात कर्जमाफी मिळालेले शेतकरी ३ लाख ७ हजार ३७६ 
प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकरी ८५ हजार ६६ 
पुनर्गठन केलेले शेतकरी ३ हजार ३३२ 
कर्जमाफीची रक्कम ७७५ कोटी ६९ लाख ७२ हजार ८५५ 
थकबाकीदार शेतकरी १ लाख ५५ हजार ६ 
थकबाकीची रक्कम ९०१ कोटी ५८ लाख ६४ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com