agro agriculture news marathi ; karanja Market under the Goods Mortgage Scheme Allotment of 2.5 crore by the Committee | Agrowon

शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार समितीने केले अडीच कोटींचे वाटप

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात दाखल होताच शेतमालाचे भाव पडणे हे नित्याचेच झाले आहे. किंबहुना अशा प्रकारचे षड्‌यंत्र व्यापाऱ्यांकडून रचल्या जात असल्याच्या चर्चाही होतात. यावर उपाय म्हणून शासनाच्या पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारणयोजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देत येथील बाजार समितीने अडीच कोटींचे वाटप केले आहे.

कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात दाखल होताच शेतमालाचे भाव पडणे हे नित्याचेच झाले आहे. किंबहुना अशा प्रकारचे षड्‌यंत्र व्यापाऱ्यांकडून रचल्या जात असल्याच्या चर्चाही होतात. यावर उपाय म्हणून शासनाच्या पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारणयोजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ देत येथील बाजार समितीने अडीच कोटींचे वाटप केले आहे.

या योजनेनुसार, शेतकऱ्यांना आपला शेतमाल मिळेल त्या भावात न विकता तारण ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, ही योजना सद्य:परिस्थितीत शेतकऱ्यांना तारक ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतमाल तारण ठेवून बाजार समितीच्या वतीने त्या शेतमालावर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

या अनुषंगाने ही योजना कारंजा बाजार समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मिळत असल्याने या योजनेप्रति व बाजार समिती प्रति शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केल्या जात आहे. यंदा २३ ऑक्टोबरपासून तारण योजनेला कारंजा बाजार समितीत प्रारंभ करण्यात आला. 

आजवर कारंजा बाजार समितीने सुमारे १८२ शेतकऱ्यांचे १३ हजार ७८१ क्विंटल सोयाबीन तारण म्हणून ठेवले असून, त्या पोटी शेतकऱ्यांना दोन कोटी ८९ लाख ४० हजार १०० रुपयांचे कर्ज म्हणून वितरण करण्यात आले. या योजनेमुळे मिळालेल्या कर्जाने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाची सोय झाली. तर, दैनंदिन आर्थिक समस्याही मिटली.

याकरिता, बाजार समितीतील दर लक्षात घेऊन त्या किंमतीच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिल्या जाते. यासाठी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदर आकारल्या जातो. 
सहा महिन्यांच्या आत बाजार समितीकडे कर्जाच्या रकमेची परतफेड केल्यास संबंधित शेतकऱ्याला वखार महामंडळाच्या गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत परत करण्यात येते. तसेच, सदर मालाची शेतकरी स्वतः विक्री करू शकतो. ही योजना शेतकऱ्यांसाठी तारक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांतून उमटत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...