नाशिक जिल्ह्यात मजूरटंचाईचा फटका; भात कापण्या संथ गतीने

मजूरटंचाईचा फटका; भात कापण्या संथ गतीने
मजूरटंचाईचा फटका; भात कापण्या संथ गतीने

नाशिक : जिल्ह्यातील मुख्य भात पट्टा असलेल्या इगतपुरी तालुक्यात भात कापणीचे कामे संथ गतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामांना चालू वर्षी मजूरटंचाई जाणवत असल्याने भात कापणीची कामे लांबणीवर गेली आहेत.  इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्य पीक असलेल्या भात काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांची मजुरांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची मजूर मिळण्यासाठी तारांबळ होताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी भातशेतीत अजूनही साचलेले आहे. त्यामुळे वाफसा होताना अनेक ठिकाणी असल्याने मजुरांना मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसरातील मजूर अधिक रोज मागत आहेत. इगतपुरीच्या पूर्व भागातील धामणी, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भात काढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्राची मदत घेऊन भात काढणीचे काम सुरू आहेत. या वर्षी पावसाने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोर धरल्यामुळे अजूनही काही परिसरातील भातशेतीमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या ठिकाणी भात काढणीचे काम हे मजुरांशिवाय होऊच शकत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. मजूर मिळाले तरी त्यांना ते मागतील तसा रोज द्यावा लागतो परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे.

मजूरटंचाईमुळे यंत्राचा पर्यायी वापर  भात काढणीची व मळणीची कामे यंत्रानेच करण्याचे ठरविले असून, परिसरात अनेक ठिकाणी ही यंत्रे उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे भाताची मळणी करणे करणे अधिक सोपे झाले आहे. या यंत्राच्या माध्यमाने एका तासामध्ये ३०० किलो भाताची मळणी होते. दिवसाला आठ तास मशिन चालल्यास साधारणत: २.५ टन भाताची मळणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च कमी होतो. गावात एक मळणीयंत्र उपलब्ध झाल्याने मजूरटंचाई दूर होण्यास मदत होत असून, यंत्राचा पर्यायी वापर होताना दिसत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com