agro agriculture news marathi ; Labor shortage Slowing down the rice | Agrowon

नाशिक जिल्ह्यात मजूरटंचाईचा फटका; भात कापण्या संथ गतीने

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नाशिक : जिल्ह्यातील मुख्य भात पट्टा असलेल्या इगतपुरी तालुक्यात भात कापणीचे कामे संथ गतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामांना चालू वर्षी मजूरटंचाई जाणवत असल्याने भात कापणीची कामे लांबणीवर गेली आहेत. 

नाशिक : जिल्ह्यातील मुख्य भात पट्टा असलेल्या इगतपुरी तालुक्यात भात कापणीचे कामे संथ गतीने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कामांना चालू वर्षी मजूरटंचाई जाणवत असल्याने भात कापणीची कामे लांबणीवर गेली आहेत. 

इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्य पीक असलेल्या भात काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांची मजुरांसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची मजूर मिळण्यासाठी तारांबळ होताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी भातशेतीत अजूनही साचलेले आहे. त्यामुळे वाफसा होताना अनेक ठिकाणी असल्याने मजुरांना मोठी कसरत करावी लागत असल्याने परिसरातील मजूर अधिक रोज मागत आहेत.

इगतपुरीच्या पूर्व भागातील धामणी, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात भात काढणीची कामे मजूर मिळत नसल्याने यंत्राची मदत घेऊन भात काढणीचे काम सुरू आहेत. या वर्षी पावसाने ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यापर्यंत जोर धरल्यामुळे अजूनही काही परिसरातील भातशेतीमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या ठिकाणी भात काढणीचे काम हे मजुरांशिवाय होऊच शकत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. मजूर मिळाले तरी त्यांना ते मागतील तसा रोज द्यावा लागतो परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक खर्चाचा सामना करावा लागत आहे.

मजूरटंचाईमुळे यंत्राचा पर्यायी वापर 
भात काढणीची व मळणीची कामे यंत्रानेच करण्याचे ठरविले असून, परिसरात अनेक ठिकाणी ही यंत्रे उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे भाताची मळणी करणे करणे अधिक सोपे झाले आहे. या यंत्राच्या माध्यमाने एका तासामध्ये ३०० किलो भाताची मळणी होते. दिवसाला आठ तास मशिन चालल्यास साधारणत: २.५ टन भाताची मळणी करता येते. यामुळे शेतकऱ्यांचा मनुष्यबळासाठी लागणारा खर्च कमी होतो. गावात एक मळणीयंत्र उपलब्ध झाल्याने मजूरटंचाई दूर होण्यास मदत होत असून, यंत्राचा पर्यायी वापर होताना दिसत आहे. 


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...