agro agriculture news marathi ; In the major market societies in Khandesh, the tide arrival is negligible, the rate low | Agrowon

खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही मर्यादीत..

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक नगण्य स्वरूपात होत आहे. दर हमीभावापेक्षा कमीच मिळत असल्याचे चित्र आहे. 

ज्वारीचे पीक ७० टक्के अतिपावसाने वाया गेले आहे. अनेक भागांत तर कडबाही हाती आलेला नाही. कणसांना कोंब फुटले. यामुळे ज्या ज्वारीचे उत्पादन हाती आले, तीदेखील काळवंडली आहे. दाण्यांचा दर्जा खालावला आहे. ज्वारीची पेरणी खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, जळगावमधील चोपडा, पाचोरा, धरणगाव, रावेर, यावल या भागांत बऱ्यापैकी झाली होती.

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक नगण्य स्वरूपात होत आहे. दर हमीभावापेक्षा कमीच मिळत असल्याचे चित्र आहे. 

ज्वारीचे पीक ७० टक्के अतिपावसाने वाया गेले आहे. अनेक भागांत तर कडबाही हाती आलेला नाही. कणसांना कोंब फुटले. यामुळे ज्या ज्वारीचे उत्पादन हाती आले, तीदेखील काळवंडली आहे. दाण्यांचा दर्जा खालावला आहे. ज्वारीची पेरणी खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, जळगावमधील चोपडा, पाचोरा, धरणगाव, रावेर, यावल या भागांत बऱ्यापैकी झाली होती.

खानदेशात मिळून सुमारे एक लाख हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. मळणीच्या वेळेस पाऊस आल्याने आतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अनेक भागांत मिळालेली नाही. दुसरीकडे जे धान्य हाती आले आहे, त्याचे दरही हमीभावापेक्षा कमी आहेत. ज्वारीला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर येथील बाजारात १२०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. या बाजारांमध्ये या आठवड्यात प्रतिदिन २०० क्विंटलपेक्षाही आवक झालेली नाही. जळगावच्या बाजारात सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, जालना, बुलडाणा या भागांतील गावांमधून ज्वारीची दरवर्षी आवक होते. परंतु, या भागातही पीक हातचे गेल्याने आवक नाही. ज्वारीचा हमीभाव २५५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर मालदांडी ज्वारीसाठी हमीभाव २७०० रुपयांवर आहे. एवढे दर खानदेशातील कुठल्याही बाजारात यंदा ज्वारीला मिळालेले नाहीत.

धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा येथील बाजार समितीदेखील ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, या बाजारांमध्येही ज्वारीची आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. दर्जा अतिशय खराब असलेल्या ज्वारीला तर ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे.

ज्वारीला मागील हंगामात १७०० रुपयांचा दर मिळाला होता. परंतु, मागील हंगामात दर्जा चांगला होता. तर कडब्याला साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिशेकडा, असा उच्चांकी दर मिळाला होता. परंतु, यंदा धान्यासह कडब्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...