राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता.
बातम्या
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही मर्यादीत..
जळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक नगण्य स्वरूपात होत आहे. दर हमीभावापेक्षा कमीच मिळत असल्याचे चित्र आहे.
ज्वारीचे पीक ७० टक्के अतिपावसाने वाया गेले आहे. अनेक भागांत तर कडबाही हाती आलेला नाही. कणसांना कोंब फुटले. यामुळे ज्या ज्वारीचे उत्पादन हाती आले, तीदेखील काळवंडली आहे. दाण्यांचा दर्जा खालावला आहे. ज्वारीची पेरणी खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, जळगावमधील चोपडा, पाचोरा, धरणगाव, रावेर, यावल या भागांत बऱ्यापैकी झाली होती.

खानदेशात मिळून सुमारे एक लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. मळणीच्या वेळेस पाऊस आल्याने आतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अनेक भागांत मिळालेली नाही. दुसरीकडे जे धान्य हाती आले आहे, त्याचे दरही हमीभावापेक्षा कमी आहेत. ज्वारीला जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर येथील बाजारात १२०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. या बाजारांमध्ये या आठवड्यात प्रतिदिन २०० क्विंटलपेक्षाही आवक झालेली नाही. जळगावच्या बाजारात सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव, जालना, बुलडाणा या भागांतील गावांमधून ज्वारीची दरवर्षी आवक होते. परंतु, या भागातही पीक हातचे गेल्याने आवक नाही. ज्वारीचा हमीभाव २५५० रुपये प्रतिक्विंटल आहे. तर मालदांडी ज्वारीसाठी हमीभाव २७०० रुपयांवर आहे. एवढे दर खानदेशातील कुठल्याही बाजारात यंदा ज्वारीला मिळालेले नाहीत.
धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा येथील बाजार समितीदेखील ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, या बाजारांमध्येही ज्वारीची आवक होत नसल्याचे सांगण्यात आले. दर्जा अतिशय खराब असलेल्या ज्वारीला तर ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे.
ज्वारीला मागील हंगामात १७०० रुपयांचा दर मिळाला होता. परंतु, मागील हंगामात दर्जा चांगला होता. तर कडब्याला साडेतीन ते चार हजार रुपये प्रतिशेकडा, असा उच्चांकी दर मिळाला होता. परंतु, यंदा धान्यासह कडब्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले.
- 1 of 1503
- ››