राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता.
बातम्या
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान द्या : खासदार जाधव
अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.
अकोला ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.
बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तोमर यांची भेट घेत निवेदन दिले. सोबतच या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चाही केली. या वेळी हृषीकेश जाधव, कांता पाटील वायाळ, बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शिष्टमंडळाने तोमर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रश्नांवर केंद्र सरकार सकारात्मकपणे पायाभूत बियाणे उत्पादनास चालना देण्यासाठी प्रयत्न करेल, असेही सांगितल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी धान्य व डाळींचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी दर्जेदार बियाणे हवे आहे. सध्या ब्रिडर बियाणे खरेदी करून पायाभूत बियाणे तयार केले जाते. हे बियाणे खरेदीस केंद्राने काही वर्षांपासून बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पायाभूत बियाण्याला अनुदान न भेटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. केंद्र शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून पूर्वीप्रमाणेच या बियाण्याला अनुदान सुरू करावे, याबाबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.
- 1 of 1503
- ››