agro agriculture news marathi Make subsidy available to pulses seed growers: MP Jadhav | Agrowon

कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान द्या : खासदार जाधव

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.  

अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत बियाणे उत्पादनास शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव एस. एस. तोमर यांच्याकडे केली आहे.  

बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तोमर यांची भेट घेत निवेदन दिले. सोबतच या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चाही केली. या वेळी हृषीकेश जाधव, कांता पाटील वायाळ, बाळनाथ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे विलास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. शिष्टमंडळाने तोमर यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रश्‍नांवर केंद्र सरकार सकारात्मकपणे पायाभूत बियाणे उत्पादनास चालना देण्यासाठी प्रयत्न करेल, असेही सांगितल्याची माहिती श्री. गायकवाड यांनी दिली. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविले जात आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी धान्य व डाळींचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी दर्जेदार बियाणे हवे आहे. सध्या ब्रिडर बियाणे खरेदी करून पायाभूत बियाणे तयार केले जाते. हे बियाणे खरेदीस केंद्राने काही वर्षांपासून बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पायाभूत बियाण्याला अनुदान न भेटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. केंद्र शासनाने तांत्रिक अडचणी दूर करून पूर्वीप्रमाणेच या बियाण्याला अनुदान सुरू करावे, याबाबत शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. 


इतर ताज्या घडामोडी
माणसाचे प्राचीन पूर्वज खात झाडांचे कठीण...माणसांच्या प्राचीन पूर्वजांच्या आहारामध्ये...
प्लॅस्टिकच्या सूक्ष्मकणांचे खेकड्यांवर...सागरी किनाऱ्यावरील वाळूतील प्रौढ खेकड्यांच्या...
वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना...पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ...
जैवविविधता नोंदणीसाठी धावपळपुणे: राज्यातील खेडोपाड्यांसह शहरांमध्ये असलेल्या...
नगर जिल्ह्यात कांदा दरात चढउतार; शेतकरी...नगर  ः जिल्ह्यात मागील महिन्यात कांद्याला...
नांदेड, परभणी, हिंगोलीत साडेबारा लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
सातारा जिल्ह्यातील शेतकरी सौर...सातारा  : महावितरण कंपनीकडून कृषी पंपाच्या...
मूर्तिजापूरमध्ये कृषी अधिकारी पोचले...अकोला  ः शेतकरी विविध प्रकारची पिके घेऊन...
औरंगाबाद जिल्ह्यात शेती आधारित उद्योग,...औरंगाबाद  : जिल्ह्याचा पालकमंत्री व...
नाशिक जिल्ह्यात रब्बीची एक लाख १५ हजार...नाशिक  : जिल्ह्यात रब्बी हंगामात एकूण १ लाख...
यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस...यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार...
जळगाव जिल्ह्यात युरियाचा साठा संपला !जळगाव  ः खतांच्या वापरात आघाडीवर असलेल्या...
राजापुरात पावणेदोनशे क्विंटल भात खरेदीराजापूर, जि. रत्नागिरी  ः राजापूर तालुका...
पोल्ट्री सुरू करायचीय, नक्की वाचा......विमलताई या गावातील समाजकार्यास वाहून घेतलेल्या...
या आठवड्यात ढगाळ, थंड, कोरडे हवामान...महाराष्ट्राच्या मध्य भागावर पूर्व व पश्‍चिम...
सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित...महाग खुराकातील काही भाग स्वस्त चाऱ्या‍मधून देणे...
माथाडी कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लवकरच...पुणे  ः माथाडी आणि कामगार कायदा गुंतागुंतीचा...
नगर, नाशिकला पुढील वर्षी ऊसदरात फटका ?नगर ः नगर, नाशिकसह राज्याच्या अनेक भागांत उशिरा...
धरण कालवा सल्लागार समितीची आज नगरला बैठकनगर  : मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या...
परभणीत मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूरपरभणी  ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...