तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः डाबरे

तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः डाबरे
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः डाबरे

बुलडाणा  : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला असून, शेतकऱ्यांनी त्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले, की तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. यात हिरवी अळी अर्थात घाटे अळी, पिसारी पतंग, शेंग माशी या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेंगा पोखरणाऱ्या किडीस हिरवी अमेरिकन बोंड अळी, घाटे अळी आदी नावांनी संबोधण्यात येते. ही कीड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन, चवळी आदी कडधान्य पिकांवर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवायी कपाशी, ज्वारी, टमाटे, सूर्यफूल, करडई या पिकांवरसुद्धा आढळून येते. या किडीची मादी सरासरी ६०० ते ८०० अंडी तुरीची कोवळी पाने, देठ अथवा कळ्या, फुले तसेच शेंगांवर वेगवेगळी घालत असते. अंडी अवस्था तीन ते चार दिवसांची असते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त राहून प्रथम कोवळी पाने व देठ कुरतडून खातात. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान आभाळ आभ्राच्छादित असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्रे पाडून खाते. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगेचा पृष्ठभाग खरडून खाते व नंतर शेंगेला शेंगेच्या बाहेर राहून खाते. शेंगमाशीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतेही लक्षण दिसत नाही. मात्र जेव्हा पूर्ण वाढलेली अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. या किडींच्या नियंत्रणासाठी तृणधान्य व तेलबिया पिकांबरोबर पिकांची फेरपालट करावी. पेरणीपूर्वी मशागत खोल नांगरणी व वखरणी करावी. वेळेवर कोळपणी व खुरपणी करावी. अळ्या वेचून त्यांचा नाश करावा. हेक्टरी १० कामगंध व २० पक्षिथांबे पिकात उभारावेत. घाटे अळीच्या नियंत्रणाकरिता त्या अळीचा विषाणू (एचएनपीव्ही) प्रतिहेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरिता पाच टक्के निंबोळी अर्क फवारावा, असेही श्री. डाबरे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com