agro agriculture news marathi ; Manufacturing compost khat of waste in Satana City | Agrowon

सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता नगर परिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 

नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता नगर परिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. 

शहर स्वच्छता, शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन करून कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेला सटाण्यात सुरुवात झाला. नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचरा बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्‌घाटन बुधवार (ता. ११) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार बोरसे यांनी नगर परिषदेच्या कामकाजाबाबत कौतुक करून शहरवासीयांच्या सेवा सुविधांसाठी शासन स्तरावरून सदैव सहकार्य प्राप्त करून दिले जाईल, असे आश्वासन दिले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्ष सुनील म्हणाले, संकलित कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्याची विल्हेवाट लागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने बायोमायनिंग प्रकल्प सुरू केला असून, शहरवासीयांनीही आत्ता घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीचा वापर कटाक्षाने करावा. या बळावर शहर लवकरच स्वच्छतेबाबत राष्ट्रीय पातळीवरील थ्री स्टार मानांकन प्राप्त करेल आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या वेळी उपनगराध्यक्ष मुन्ना शेख, गटनेते राकेश खैरनार, आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, सभापती पुष्पाताई सूर्यवंशी आदींसह शहरवासीय उपस्थित होते.

बायोमायनिंगमुळे  पाच एकर जमीन होणार मोकळी 
या प्रकल्पातून पस्तीस हजार टन कचऱ्याचे बायोमिनिंग होणार असून, गेल्या पन्नास वर्षांपासून साठून राहिलेल्या कचऱ्याची येत्या सहा महिन्यांत विल्हेवाट लागणार आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून खतनिर्मिती होणार असून, यापूर्वीच्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लागल्यानंतर नगर परिषदेच्या मालकीची पाच एकर जमीन मोकळी होणार असा प्रकल्प राबविणारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगर परिषद ही पहिलीच असून, जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प एआर एनर्जी लिमिटेड, मुंबई या कंपनीच्या सहकार्याने प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...