परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये

परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये या आठवड्यामध्ये मेथी, वाटाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी (ता. २९) मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होती. मेथीच्या जुड्यांना प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चुक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.  वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ९०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ४०० रुपये रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. लिंबांची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com