नांदेड जिल्ह्यातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी

नांदेड जिल्ह्यातील खरिपाची  अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी
नांदेड जिल्ह्यातील खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी

नांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतील १ हजार ५६२ गावांची यावर्षीच्या (२०१९-२०) खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी म्हणजेच सरासरी ४७.२५ पैसे आली आहे. जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता.१५) जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १ हजार ५६२ गावशिवारातील ७ लाख ६६ हजार ६०५ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडी योग्य आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ७ लाख २० हजार १०६ हेक्टरवर पेरणी झाली. एकूण ३१ हजार ४६ हेक्टर एवढे क्षेत्र पडीक राहिले. नांदेड तालुक्यातील १३ गावांचा समावेश महानगरपालिका क्षेत्रात झाल्यामुळे त्याठिकाणी लोकवस्ती झालेली आहे. त्यामुळे या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. यंदाच्या ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यातील १ हजार ५६२ गावांची खरीप पिकांची हंगामी (नजरी) पैसेवारी ५० पेक्षा जास्त म्हणजेच सरासरी ६९.८१ पैसे आली होती.३१ आॅक्टोंबर रोजी जाहीर केलेली खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५८.६८ पैसे आली होती. यंदा, खरीप पिकांची हंगामी (नजरी) आणि सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आली होती. परंतु, अंतिम पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा म्हणजेच सरासरी ४७.२५ पैसे आली आहे असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com