agro agriculture news marathi ; Need to weave orange marketing nets: hesitate | Agrowon

संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज ः जिचकार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा उत्पादनासाठी पुढाकार घेत देशाअंतर्गत आणि देशाबाहेर मार्केटिंगसाठी शेतकरी कंपन्यांच्या मार्फत जाळे विणले पाहिजे. त्यासाठी अपेडा तसेच पणन मंडळाने शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनीचे रमेश जिचकार यांनी व्यक्‍त केले.

अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा उत्पादनासाठी पुढाकार घेत देशाअंतर्गत आणि देशाबाहेर मार्केटिंगसाठी शेतकरी कंपन्यांच्या मार्फत जाळे विणले पाहिजे. त्यासाठी अपेडा तसेच पणन मंडळाने शेतकरी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत श्रमजीवी संत्रा उत्पादक कंपनीचे रमेश जिचकार यांनी व्यक्‍त केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाच्या वतीने वरुड येथील बाजार समितीत आयोजित फळे व भाजीपाला विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती अजय नागमोते, तालुका कृषी अधिकारी यु.आर. आगरकर,साहाय्यक निबंधक श्रीमती धोपे, बाजार समिती उपसभापती अनिल गुल्हाने, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाबाराव बहुरूपी, प्रकाश वानखडे, अक्षय ठाकरे, अनूप फरकाडे यांची या वेळी उपस्थिती होती. रमेश जिचकार  म्हणाले, निर्यातक्षम संत्रा उत्पादनकाळाची गरज आहे. त्याकरिता फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी पूरक प्रयत्न करावे लागतील. त्याकरिता आवश्‍यक ते तंत्रज्ञान संशोधन संस्थांनी दिले पाहिजे. नवीन वाणांची देखील गरज असून त्यासाठी देखील संशोधक संस्थांच्या पुढाकाराचीच गरज आहे. 

द्राक्षाप्रमाणे संत्र्यांची देखील विविध वाणनिर्मिती येत्या काळात झाल्यास संत्रा उत्पादकांचे व्यापक हित साधले जाईल. पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक महादेव बरडे यांनी मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यासोबत प्रा.महल्ले, प्रा. साबळे यांनी संत्रा, मोसंबी व भेंडी पिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...