थकीत ऊस पेमेंटप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन 

थकीत ऊस पेमेंटप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन 
थकीत ऊस पेमेंटप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन 

नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेल्यानंतर अनेक ऊस उत्पादकांचे थकीत देयक अदा केलेले नाही. त्यामुळे गेल्या ११ महिन्यांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. हे थकीत पैसे त्वरित देण्यात यावेत आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २३) धरणे आंदोलन करण्यात आले आहे.  या वेळी आंदोलनात १०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. निफाड तालुक्यातील निफाड साखर कारखाना आणि रानवड साखर कारखाना बंद असल्याने पर्यायाने विश्वास ठेवून केजीएस कारखान्याला ऊस दिला. मात्र, त्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक कोंडी झाली. तर दुसरीकडे सरकारने कर्जमाफीचा शब्द दिला असताना १०० टक्के कर्जमाफी नसल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना पुन्हा उभे करण्यासाठी आमचे थकीत उसाचे पेमेंट अदा करा. शासनाकडून आमची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही. जर आमच्या मागण्या विचारात न घेतल्यास तहसील कार्यालयाच्या परिसरातील झाडांना गळफास घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. सरकार आणि प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, असे स्वाभिमानीचे सोमनाथ बोराडे यांनी सांगितले. पैसे मिळाले नाही तर शेतकरी उद्‌ध्वस्त होईल, असे स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com