खानदेशात कांद्याची आवक नगण्य

खानदेशात कांद्याची आवक नगण्य
खानदेशात कांद्याची आवक नगण्य

जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक नगण्यच आहे. कमी दर्जाच्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार तर दर्जेदार कांद्याला कमाल आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. आवक पुढेही वाढणार नसल्याची स्थिती आहे.  खानदेशात खरिपातील कांद्यासाठी पिंपळनेर (ता.साक्री), धुळे, जळगाव, अडावद (ता.चोपडा) येथील बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. या सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची या हंगामातील आवक नगण्य अशीच राहिली. मागील महिनाभरात जळगाव बाजार समितीत प्रतिदिन सरासरी ५०० क्विंटल, अडावद येथे प्रतिदिन ५०० क्विंटल, तर पिंपळनेरच्या बाजारात प्रतिदिन सरासरी ८०० क्विंटलची आवक झाली. मागील वर्षी जळगाव बाजार समितीत खरिपातील कांद्याची आवक नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी अनुक्रमे तीन हजार व अडीच हजार क्विंटलपर्यंत होती. त्यातच मोठे खरेदीदार थेट शिवार खरेदीमध्ये कांद्याची उचल करीत आहेत. शिवार खरेदीसंबंधीच्या नोंदी बाजारात होत नसल्याचे सांगण्यात आले. कांदा काढणीचा हंगाम खानदेशात पूर्ण झाला आहे. आता रब्बीमधील कांदा लागवड सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही लागवड पूर्ण होईल. कांद्याची आवक पुढे आणखी कमी होईल. यामुळे दरात फारशी घसरण होणार नाही, अशी माहिती मिळाली.  जळगाव जिल्ह्यात यंदा किनगाव (ता.यावल) व चाळीसगाव येथील बाजारातही कांद्याची फारशी आवक झालेली नसल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com