agro agriculture news marathi ; Onion seedlings are stolen due to increase in Sinnar taluka! | Agrowon

सिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी!

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे उन्हाळ कांद्याने बाजारात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चालूवर्षी पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय, मात्र थोड्याफार प्रमाणात कांद्याची रोपे शिल्लक आहेत. याच कारणाने रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उपलब्धता व दरवाढीच्या कारणामुळे जिल्ह्यात कांद्याची रोपांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 

नाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे उन्हाळ कांद्याने बाजारात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चालूवर्षी पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय, मात्र थोड्याफार प्रमाणात कांद्याची रोपे शिल्लक आहेत. याच कारणाने रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उपलब्धता व दरवाढीच्या कारणामुळे जिल्ह्यात कांद्याची रोपांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी भिमा लक्ष्मण गिते यांच्या देशवंडी शिवारातील गट नंबर. ४५१ या क्षेत्रातुन चोरट्याने लागवडीयोग्य झालेले कांद्याच्या रोपांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी चाळीतून कांदा चोरीचे - चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र आता कांदा रोपांचीच चोरी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कांदा रोपांची चोरी अन् हजारोंचे नुकसान 
अतिपावसमुळे रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून पहिल्या टप्प्यात लागवडी सुरू आहेत. मात्र रोपांची टंचाई असल्याने दुसऱ्या टप्प्यात लागवडी करण्यासाठी पुन्हा रोपवाटिका तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा बियाण्याचा दर २ ते ३ हजार रु किलो दर आहे तर एकरसाठी लागणाऱ्या रोपांचा दर ३५ ते ४० हजारांवर आहे. नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासून शेतातील औजारे, कृषीपंप, केबल आदी वस्तूंच्या चोऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच थेट रोपांची चोरी झाल्याने त्यांचे १० ते १५ हजारांचे नुकसान झाल्याचे श्री. गिते यांनी सांगितले. 


इतर बातम्या
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
‘पांडुरंग', 'विठ्ठल’च्या निवडणुकांकडे...सोलापूर : आगामी वर्षात जिल्ह्यातील आघाडीच्या...
शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंगजालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी...
सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन...सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी...
लोणंद बाजार समितीत कांद्याला ११...लोणंद, जि. सातारा : कांद्याची आवक घटल्याने लोणंद...
किमान तापमानात घसरण, थंडीत चढ-उतार...महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीवर उत्तर दिशेने...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या...
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावासातारा : ‘‘उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन...
टेंभू, ताकारी, म्हैसाळच्या पूर्णत्वाची...सांगली : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या...
चोरट्यांपासून कांद्याच्या रक्षणासाठी...नगर ः बाजारात टंचाई असल्याने महिनाभरापासून...
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या...नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
नगरमध्ये ज्वारीवरील लष्करी अळीबाबत...नगर ः ज्वारीवर लष्करी अळी पडल्याने ज्वारीला...
नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय...अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या...
आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसांत ः...मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणीच्या...नांदेड : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) पर्यंत एकूण १...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
सिंचन घोटाळ्यात अजित पवार निर्दोष;...मुंबई ः राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात...
साखर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष...पुणे ः साखर कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे....
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...