agro agriculture news marathi ; Onion stockpiling operations started | Agrowon

कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची कार्यवाही सुरू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण पडल्याने कांदासाठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले आहेत. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदीनंतर साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण पडल्याने कांदासाठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले आहेत. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदीनंतर साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

केंद्राच्या अन्न नागरीपुरवठा व ग्राहक मंत्रालयाने शुक्रवार (ता. ६) आदेश जारी करून कांदासाठा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे पी. टी. महाजन यांनी लासलगाव परिसरात स्थानिक महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्यासोबत साठा तपासणी केली. शासनाने यापूर्वीच थेट आदेश देत रविवार (ता. ३) साठवणुकीवर असलेली मर्यादा घटविली आहे.

राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपेक्षा जास्त कांद्याचा साठा ठेवता येणार नाही. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यातील कांदा साठा तपासणी दररोज करून अद्ययावत साठा माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी निफाड तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक यांनी कांदा साठवणुकीची सविस्तर माहिती अहवालात देण्याचे व अतिरिक्त साठा दिसल्यास लागलीच जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत.

तहसीलदार श्री. पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत, विंचूर, निफाड, सायखेडा यांसह खेरवाडी भागातही ही तपासणी त्या-त्या स्थानिक महसूल मंडळ निरीक्षक यांना दररोज तपासणी करून चाळींमध्ये उपलब्ध कांद्याची नोंद, तसेच सर्व बाजार समित्यांनी कांदा आवक, विक्री आणि शिल्लक साठ्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच अतिरिक्त साठा दिसला तर लागलीच स्थानिक पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल पाठवावा लागणार आहे.

सहकार खातेही ''दक्ष'' 
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील कांदा व्यापाऱ्यांच्या कांदा खळ्यावर किती कांदा आहे? व शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे का? याबाबत निफाड येथील सहकार खात्याचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या विशेष पथकाने अचानक पाहणी करून तपासणी केली.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...