वऱ्हाडात कांद्याच्या क्षेत्रात वाढीची शक्यता

वऱ्हाडात कांद्याच्या क्षेत्रात वाढीची शक्यता
वऱ्हाडात कांद्याच्या क्षेत्रात वाढीची शक्यता

अकोला  : कांद्याला या वर्षात मिळत असलेल्या दरांमुळे रब्बी लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. कांदा तसेच कांदा बीजोत्पादनाकडे शेतकरी वाळलेला असून यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र किमान ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी वऱ्हाडात रब्बी तसेच उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायची. शेतकरी खरिपातील पिके काढून या कांदा लागवडीकडे वळत होते. दरम्यानच्या काळात कांद्याला पुरेसा दर न मिळाल्याने तसेच सिंचनासाठी पाणी समस्या बनली होती. यंदाची परिस्थिती दर आणि पाणी याबाबतीत चांगली आहे. फक्त शेतकऱ्यांना वीज भारनियमन मोठ्या प्रमाणात छळत आहे. मागील काही वर्षांपासून कमी झालेल्या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळी खूपच खालावली होती. परिणामी, रब्बीतील पिके तसेच नियमित बागायती क्षेत्र कमी झाले. परंतु, यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पाणीपातळीत सुधारणा झाली. सर्वत्र गहू, हरभरा आणि कांद्याची लागवड सुरू आहे. कधी नव्हे ते कांद्याला उचांकी दर मिळत असल्याने कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा जोर अधिक आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोला, बुलडाण्यात जळगाव जामोद, चिखली, मेहकर, वाशीममध्ये मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड आदी तालुक्यांमध्ये कांदा तसेच कांदा बीजोत्पादन घेतले जाते. यंदाची परिस्थिती यादृष्टीने चांगली आहे. कांद्याला दर असून पाण्याचीसुद्धा व्यवस्था आहे. शेतकऱ्यांना अशा परिस्थितीत केवळ वीज भारनियमनाचा मोठा त्रास झेलावा लागत आहे. सध्या हिवाळ्यातच अशी परिस्थिती असल्याने आगामी महिन्यात भारनियमनाचा बोजा आणखी वाढू शकतो, अशी चिंता भेडसावत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com