agro agriculture news marathi ; Protecting crops in polyhouse is possible through integrated pest management | Agrowon

एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून पॉलिहाउसमधील पिकांचे संरक्षण शक्य

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यावर सूत्रकृमी सारख्या समस्या नियंत्रणात येत नाहीत. याकरता कायमस्वरूपी उपाय म्हणून जैविक घटकांकडे सकारात्मक बघून दीर्घकालीन उपाय करावेत. पॉलिहाउस मधील वातावरणात लालकोळी थ्रिप्स सारख्या किडींच्या प्रादुर्भावाची तीव्रता अलीकडच्या काळात जाणवत आहे. त्यासाठी रासायनिक कीड नाशकासोबत सूक्ष्म जीव आधारित जैविक घटक किंवा वनस्पती जन्य घटक वापरावेत. जमिनीतील हानिकारक बुरशी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सारख्या घटकांचा वापर करावा, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून पॉलिहाउसमधील पिकांचे संरक्षण शक्य असल्याचे मत प्रा.तुषार उगले यांनी मांडले. 

नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक घेतल्यावर सूत्रकृमी सारख्या समस्या नियंत्रणात येत नाहीत. याकरता कायमस्वरूपी उपाय म्हणून जैविक घटकांकडे सकारात्मक बघून दीर्घकालीन उपाय करावेत. पॉलिहाउस मधील वातावरणात लालकोळी थ्रिप्स सारख्या किडींच्या प्रादुर्भावाची तीव्रता अलीकडच्या काळात जाणवत आहे. त्यासाठी रासायनिक कीड नाशकासोबत सूक्ष्म जीव आधारित जैविक घटक किंवा वनस्पती जन्य घटक वापरावेत. जमिनीतील हानिकारक बुरशी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सारख्या घटकांचा वापर करावा, एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून पॉलिहाउसमधील पिकांचे संरक्षण शक्य असल्याचे मत प्रा.तुषार उगले यांनी मांडले. 

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ''सकाळ-ॲग्रोवन यांच्यातर्फे ‘ॲग्रो संवाद'' कार्यक्रमात ‘पॉलिहाउस’मधील कीड रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन’ या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रा.उगले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. इकोझेन सोल्युशन कंपनी यांच्या वतीने चर्चासत्र प्रायोजित होते. 

चर्चासत्रात पुढे बोलताना प्रा. उगले म्हणाले, लालकोळी कीटक, पांढरीमाशी हे पानावरील रस शोषण करते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे लिंबोळी पेंड,दालचिनी तेलाचा अर्क वापरल्याने अंडीचा प्रादुर्भावाला आळा घातला जातो. प्रत्येक पिकाच्या अवस्थेनुसार मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांच्या शिफारशी उपलब्ध नाहीत. परिणामी, पीकवाढीच्या अवस्थेत कोणती खते वापरावीत, सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती व किती प्रमाणात वापरावी, या विषयीची माहिती त्यांनी दिली.या वेळी इकोझेन सोल्युशन कंपनीचे श्रीरंग देशपांडे यांनी नाशवंत मालाची टिकवणक्षमता कशी वाढवावी, याविषयी एकोफ्रोस्ट सोलर कोल्ड रूम विषयीची माहिती प्रोजेक्ट्द्वारे दिली. त्यात फळे, फुले, भाज्या आणि इतर खराब होणाऱ्या वस्तूंना जास्त वेळ पर्यंत थंड ठेवता येते, व नासाडी न झाल्यामुळे उत्पादकता वाढते, ताजी फळे, फुले,आणि भाज्यांची योग्य किंमत मिळाल्यामुळे उत्पन्न वाढते, असे सांगितले.

उपसरपंच बाकेराव मौले यांनी प्रा. उगले व श्री देशपांडे यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. चर्चा सत्राला ज्ञानेश्वर गोवर्धने, संजय गोवर्धने, रमेश मौले, सुनील मौले, सुरेश गोवर्धने, सुभाष मौले, संतोष विधाते, योगेश गोवर्धने, अनिल गोरे, सुनील मौले, महेश तिडके आदी पॉलिहाउस धारक युवा शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन विलास गरुड यांनी केले. ''सकाळ''चे बातमीदार नंदकुमार डिंगोरे यांनी आभार मानले.  


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...