agro agriculture news marathi Purchase of cotton for Rs 4900 to 5000 per quintal | Agrowon

कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा खरेदी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर स्थिर असून, खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. १८ ते २२ टक्के आर्द्रतेच्या कापसाचे दर ४५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. खेडा खरेदी स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार व किरकोळ व्यापारी करीत आहेत.

जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर स्थिर असून, खेडा खरेदीमध्ये शेतकऱ्यांना ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहेत. १८ ते २२ टक्के आर्द्रतेच्या कापसाचे दर ४५०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती मिळाली. खेडा खरेदी स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदार व किरकोळ व्यापारी करीत आहेत.

गुजरातमधील कारखानदार, व्यापारी किंवा निर्यातदारांचे एजंट खानदेश, औरंगाबादमधील फुलंब्री, सिल्लोड भागात खेडा खरेदी करीत नसल्याची स्थिती आहे. मागील वर्षी गुजरातमधील व्यापारी, कारखानदारांच्या एजंटकडून कापसाची मोठी खरेदी नोव्हेंबर ते जानेवारी यादरम्यान करण्यात आली होती. यंदा गुजरातमध्ये सूत व कापड उद्योगाला फटका बसल्याने सूत, रुईच्या व्यापारावर परिणाम झाला आहे. गुजरातमधील खंडीचे (३७० किलो रुई) दर राज्यातील खंडीच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत. खंडीला सध्या कमाल ४० हजार रुपयांचा दर गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात आहे. 

मध्य प्रदेश व गुजरातमध्ये कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची वेचणी सुरू झाली आहे. यामुळे तेथील खरेदीदारांकडून राज्यातील पश्‍चिम विदर्भ, खानदेश व औरंगाबाद भागांत होणारी कापसाची खेडा खरेदी कमी झाली आहे. सध्या किरकोळ व्यापारी, स्थानिक जिनिंग प्रेसिंग कारखानदारांचे एजंट खेडा खरेदी करीत आहेत. भारतीय कापूस महामंडळाची खरेदी वेगात सुरू आहे. सीसीआयचे मलकापूर (जि. बुलडाणा), शिरपूर (जि. धुळे), जळगाव येथील केंद्र जोमात सुरू आहे. या केंद्रातील आवक वाढली आहे. सीसीआयच्या खानदेशातील आठ केंद्रांमध्ये मिळून सुमारे ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सीसीआयच्या खरेदीची स्पर्धा असल्याने खेडा खरेदीमध्ये कापसाचे दर टिकून आहेत. खानदेश, पश्‍चिम  विदर्भ व औरंगाबादमधील फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड या भागांत मिळून सुमारे १० लाख गाठींच्या कापसाची आवक जिनिंग प्रेसिंग कारखाने, किरकोळ खरेदीदारांकडे झाली आहे. 

शिरपूर, शहादा (जि. नंदुरबार), चोपडा (जि. जळगाव) या भागात गुजरात, मध्य प्रदेशातील कारखानदारांचे एजंट खरेदी करीत आहेत. शिरपूरमधील निमझरी व सातपुडा लगतच्या इतर गावांमध्ये मागील आठवड्यात कापसाला खेडा खरेदीत कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन व सेंधवा येथील बाजारात कापसाची आवक वाढली आहे. तेथेही दर कमाल ५२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. तर तेथे देशी कापसाचे दर ५५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

खानदेश, औरंगाबादमधील खानदेशलगतचा भाग, पश्‍चिम विदर्भात मिळून १०३ जिनिंग कारखाने सुरू आहेत. या जिनिंगमध्ये कापसाची आवक मागील आठवड्यात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर दिसत नसल्याने कारखानदार आपल्या जिनिंग प्रेसिंग कारखान्यात निम्म्या क्षमतेनेच कापसावर प्रक्रिया करीत असल्याचे सांगण्यात आले.

सरकीचे दर २२०० पर्यंत
सरकीचे दर मागील ३० ते ३५ दिवसांत क्विंटलमागे १००० ते ११०० रुपयांनी घसरले आहेत. परंतु, मागील आठ ते नऊ दिवसांपासून दर २२०० रुपयांवर स्थिर आहेत. सरकी दरांवरील दबाव वातावरण कोरडे व निरभ्र होईल, तोपर्यंत कायम राहू शकतो, असे सांगण्यात आले. 


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...