agro agriculture news marathi ; Rabbi sowing in Khandesh at 60% | Agrowon

खानदेशात रब्बीची पेरणी ६० टक्‍क्‍यांवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामासंबंधी अनुकूल स्थिती असून, पेरणी सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली आहे. मका व बाजरीची पेरणी सुरूच असून, पेरणीची टक्केवारी किमान ९० टक्‍क्‍यांवर जाण्याचे संकेत आहेत. 

जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामासंबंधी अनुकूल स्थिती असून, पेरणी सुमारे ६० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली आहे. मका व बाजरीची पेरणी सुरूच असून, पेरणीची टक्केवारी किमान ९० टक्‍क्‍यांवर जाण्याचे संकेत आहेत. 

कोरडवाहू क्षेत्रातील हरभरा व ज्वारीची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा, संकरित ज्वारीची पेरणी पूर्ण केली आहे. काही शेतकऱ्यांनी मक्‍याची लागवड केली आहे. परंतु, अनेक शेतकरी कापसाखालील क्षेत्र रिकामे करीत आहेत. या क्षेत्रात मका व बाजरीची पेरणी सुरू आहे. ही पेरणी पूर्ण होण्यास आणखी २० ते २५ दिवस लागतील. बाजरीची पेरणी काही शेतकरी जानेवारीच्या सुरुवातीला करतील. 

खानदेशात यंदा सुमारे चार ते सव्वाचार लाख हेक्‍टरवर रब्बी हंगाम उभा राहण्याचे संकेत आहेत. जळगाव जिल्ह्यात किमान सव्वादोन लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे ५५ टक्के, धुळ्यात ६५ तर नंदुरबारात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. खानदेशात मिळून हरभऱ्याची सुमारे दीड लाख हेक्‍टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. यापाठोपाठ कोरडवाहू दादर ज्वारी व संकरित ज्वारीची पेरणी झाली आहे. तर मक्‍याची सुमारे ४० हजार हेक्‍टरवर लागवड  झाल्याचा अंदाज आहे. 

कांद्याची लागवड यंदा सुमारे दीड हजार हेक्‍टरने वाढू शकते. सर्वाधिक लागवड धुळे, साक्री, जळगावमधील यावल, चोपडा या भागात होण्याचे संकेत आहेत. पेरणी जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. यामुळे पेरणीची अंतिम आकडेवारी जानेवारीच्या मध्यानंतर समोर येऊ शकते, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले. 

रब्बी हंगामासंबंधी सिंचन प्रकल्पांमधून पाणी दिले जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात यासंबंधीची अर्जप्रक्रिया राबविली जात असून, येत्या ३१ तारखेपर्यंत पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयात संबंधित लाभार्थींनी अर्ज सादर करायचे आहेत, अशी माहिती मिळाली. 

वाघूरमधून आवर्तन सोडा
जिल्ह्यात गिरणा धरणानंतर वाघूर सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून यंदा सिंचनासाठी लवकर पाणी सोडले जावे, अशी मागणी जळगाव, भुसावळ भागांतील शेतकरी करीत आहेत. जळगाव तालुक्‍यात कोरडवाहू हरभरा व ज्वारीसाठी पाण्याची आवश्‍यकता आहे. पीक सुमारे एक ते सव्वा महिने कालावधीचे झाले आहे. पाणी वेळेत मिळाले तर त्याची चांगली वाढ होईल. त्यासाठी पाणी आरक्षणाबाबतचा निर्णय लवकर होण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात अजूनही पालकमंत्री मिळालेले नाहीत. सिंचन प्रकल्पांचा आढावा झालेला नाही. शेतीला किती पाणी मिळेल? हे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलेले नाही. यामुळे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करून हा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...