अतिवृष्टी बाधितांच्या कर्जमाफीच्या याद्या उपलब्ध

अतिवृष्टी बाधितांच्या कर्जमाफीच्या याद्या उपलब्ध
अतिवृष्टी बाधितांच्या कर्जमाफीच्या याद्या उपलब्ध

नागपूर  ः जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी बाधितांचे एक हेक्‍टरपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार याकरिता पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तालुका निबंधक, सहकारी संस्था, बॅंक शाखांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने अशा बाधित शेतकऱ्यांचे एक हेक्‍टरपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. २३ व २७ ऑगस्ट रोजी त्यासाठी शासन आदेश जारी करण्यात आला.      शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे पिकाचा पंचनामा जिल्हा महसूल प्रशासनाकडून करण्यात आला. त्याआधारे बाधित शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित तहसील कार्यालयाकडून सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या याद्या जिल्ह्यातील सर्व बॅंक शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था तसेच तालुका साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयास कर्जमाफी मागणी प्रस्ताव तयार करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com