कांदा साठवणूक मर्यादा हटवा : बनकर

कांदा साठवणूक मर्यादा हटवा ः बनकर
कांदा साठवणूक मर्यादा हटवा ः बनकर

नाशिक  ः राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र कांद्याची टंचाई जाणवत होती. त्या वेळी केंद्र शासनाने व्यापाऱ्यांकडील कांदा साठवणुकीसाठी मर्यादा घातल्या होत्या. किरकोळ व्यापारी ५ टन, घाऊक व व्यापाऱ्यांना २.५ टन मर्यादेपर्यंत कांदा साठवणूक मर्यादा घातली आहे. पंरतु उन्हाळ कांदा संपला असून, लाल कांद्याची बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. साठवणुकीच्या मर्यादेमुळे व्यापारी आॅर्डर असताना कांद्याची खरेदी करू शकत नाहीत.  त्यामुळे कांदा बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कांदा साठवणुकीवर असलेले मर्यादा हटविण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी सहकार व पणनमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत मुंबई येथे नुकतीच भेट घेऊन सध्यस्थीती त्यांच्या लक्षात आणून दिली.  कांदा बाजारात लाल कांदा खरेदी केल्यानंतर त्यांची सुकवणी, विगतवारी व पॅकेजिंग मध्ये तीन दिवस जातात व तो वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो. आपले व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी व्यापारी वर्गाला दररोज खरेदी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कांदा व्यापारी दररोज बाजार समितीत रोजच्या रोज कांदा खरेदी करेल. पर्यायाने शेतकऱ्यांच्या सर्व कांद्याची विक्री होईल, त्यांना चांगले पैसे मिळतील व ग्राहकांना मुबलक कांदा उपलब्ध होईल. असे आमदार बनकर यांनी भेटीदरम्यान सांगितले. आमदार बनकर यांनी अन्न, नागरी पुरवठा ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनाही याबाबत पत्रव्यवहार करून माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून प्रतिकूल परिस्थितीत थोडे फार उत्पादन झाले आहे. तरी त्यांना दोन पैसे मिळावे. कांदा साठवणुकीसाठी असलेली मर्यादा हटविण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गास योग्य त्या आदेश व सूचना देण्याची विनंती त्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com