नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन
नाशिक : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या स्मृतिदिन साजरा करून कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार (ता. १२) कळवण येथे सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार व तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व वीजबिल मुक्ती करावी, कोरड्या व ओल्या दुष्काळामध्ये नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून हंगामी पिकांना एकरी ३० हजार व फळबागांना एकतरी १ लाख रुपये अर्थसहाय्य मिळावे अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी यावेळी मांडली. मागील वर्षात जाहीर झालेल्या दुष्काळी अनुदानाची मदत ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या अशी मागणी निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आली. शासनाने निर्बंधमुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मान्य न केल्यास रविवार (ता. २२) शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे बाळासाहेब शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
या वेळी धनंजय पवार, अशोक पवार, कौतिक पगार, अंबादास जाधव, कारभारी आहेर, शांताराम जाधव, कुबेर जाधव, राजेंद्र भामरे, निंबा पगार, विलास रौंदळ, विठोबा बोरसे, रामा पाटील, घनशाम पवार, राजेंद्र पवार, रत्नाकर गांगुर्डे, भिला पवार, नितीन पवार, नरेंद्र पवार, राजेंद्र पगार आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकरी, शेतमजूर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्या वतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या आहेत प्रमुख मागण्या
- शेतीमाल व्यापारातील सहकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करून शेतकऱ्यांना व्यापार स्वातंत्र्य द्यावे.
- महाराष्ट्रातील सर्व शेतमाल नियममुक्ती करावा.
- जगभरात तयार असणारे नवीन संशोधीत जीएम तंत्रज्ञानाची बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी.
- सर्व बाजार समित्यांमधून हमीभाव खरेदी करण्यात यावे.
- 1 of 1502
- ››