नाशिकमधील पीडित महिलांसाठी ‘सखी’ निवारा केंद्र

नाशिकमधील पीडित महिलांसाठी ‘सखी’ निवारा केंद्र
नाशिकमधील पीडित महिलांसाठी ‘सखी’ निवारा केंद्र

नाशिक : ‘‘समाजात वावरताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा महिलांना मदतदेखील मिळत नाही. मात्र, अशा महिलांसाठी आता वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून मदतीचा हात मिळणार आहे,’’ असे प्रतिपादन, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. राज्य व केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘सखी’ वन स्टॉप सेंटरचे उद्‍घाटन व कोनशिलेचे अनावरण बुधवारी (ता. ११) झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी तथा वन स्टॉप सेंटरचे अध्यक्ष भुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील, उपअभियंता श्री. सोनवणे उपस्थित होते.  नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘अत्याचार पीडित, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी आणि बालविवाहाला बळी पडणाऱ्या महिलांना वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून तात्काळ मदत उपलब्ध होणार आहे. तसेच कौटुंबिक आणि लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना कायदेशीर मार्गानं लढा देण्यासाठीही मदत होणार असल्याचे ते म्हणाले.’’ श्रीमती भुवनेश्वरी म्हणाल्या, या सेंटरची माहिती होण्यासाठी महिलांमध्ये शासनस्तरावर जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पाटील म्हणाल्या, की जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीच्या देखरेखीत या केंद्राचे काम चालते. यात महिला कर्मचारी असून केंद्र व्यवस्थापक, कायदेशीर सल्लागार, समुपदेशक, वकील आणि पोलिस अधिकारी असणार आहेत. महिलांसाठी हे केंद्र २४ तास खुले असणार आहे. कार्यक्रमात ‘सखी’ वन स्टॉप सेंटर या विषयावरील माहितीपुस्तिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com