नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय नकार

नमुने निकषात, मात्र शेतीमालाला मिळतोय नकार
नमुने निकषात, मात्र शेतीमालाला मिळतोय नकार

अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी त्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त करतात, हे पुन्हा एकदा समोर येत आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडले असले, तरी त्या ठिकाणी विक्रीसाठी येणारा बहुतांश शेतमाल निकषात बसत नसल्याने खरेदी झालेला नाही. शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात, ते पासही होतात. मात्र, जेव्हा शेतमाल मोजणीसाठी घेऊन जातात त्या वेळी प्रामुख्याने आर्द्रतेच्या कारणाने खरेदीच केली जात नसल्याचे समोर येत आहे. यावर्षी शेतमाल खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र तालुक्यांच्या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. या केंद्रावर बहुतांश ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आलेला नाही. ज्या केंद्रावर शेतकरी शेतमाल घेऊन जातात, तेथे काहींचे नमुने निकषात बसतातही. परंतु, प्रत्यक्षात मोजणीच्यावेळी आर्द्रतेची मोठी अडचण निर्माण होत आहे.अकोट येथील खरेदी केंद्रावर काही शेतकरी शेतमाल घेऊन गेले असता त्यांना माल सुकवून आणा, स्वच्छ करून आणा असे सांगण्यात आले. सध्या थंडीचा कालावधी सुरू झालेला असून शेतमाल दिवसभर सुकायला टाकला तरी त्यातील आर्द्रता कमी होत नाही. शासकीय खरेदीसाठी काही विशिष्ट मर्यादेपर्यंत आर्द्रता हवी असते. नेमकी येथेच शेतमाल विकताना अडचण तयार होत आहे. यावर्षी खरिपात अतिपावसामुळे मूग, उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. ५० टक्क्यांवर शेतमाल खराब झालेला होता. ज्यांना चांगल्या प्रतिचा शेतमाल झाला अशा धान्याला दर मिळत आहे. शेतमाल विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली असून त्यांना खरेदी केंद्राद्वारे संदेश दिले जात आहेत. असे शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात. नमुने निकषात बसत असतानाही मोजमापाच्यावेळी पुन्हा अडचणी येत आहेत. प्रामुख्याने आर्द्रतेचा मुद्दा मारक झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून आर्थिक फटकाही बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com