agro agriculture news marathi ; In the sample criteria, however, the farm is getting refuse | Page 2 ||| Agrowon

नमुने निकषात, मात्र शेतमालाला मिळतोय नकार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी त्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त करतात, हे पुन्हा एकदा समोर येत आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडले असले, तरी त्या ठिकाणी विक्रीसाठी येणारा बहुतांश शेतमाल निकषात बसत नसल्याने खरेदी झालेला नाही. शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात, ते पासही होतात. मात्र, जेव्हा शेतमाल मोजणीसाठी घेऊन जातात त्या वेळी प्रामुख्याने आर्द्रतेच्या कारणाने खरेदीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.

अकोला  ः शेतकरी शेतमाल पिकवतो. मात्र, छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी त्याला मोठ्या प्रमाणात त्रस्त करतात, हे पुन्हा एकदा समोर येत आहे. शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडले असले, तरी त्या ठिकाणी विक्रीसाठी येणारा बहुतांश शेतमाल निकषात बसत नसल्याने खरेदी झालेला नाही. शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात, ते पासही होतात. मात्र, जेव्हा शेतमाल मोजणीसाठी घेऊन जातात त्या वेळी प्रामुख्याने आर्द्रतेच्या कारणाने खरेदीच केली जात नसल्याचे समोर येत आहे.

यावर्षी शेतमाल खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्र तालुक्यांच्या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत. या केंद्रावर बहुतांश ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आलेला नाही. ज्या केंद्रावर शेतकरी शेतमाल घेऊन जातात, तेथे काहींचे नमुने निकषात बसतातही. परंतु, प्रत्यक्षात मोजणीच्यावेळी आर्द्रतेची मोठी अडचण निर्माण होत आहे.अकोट येथील खरेदी केंद्रावर काही शेतकरी शेतमाल घेऊन गेले असता त्यांना माल सुकवून आणा, स्वच्छ करून आणा असे सांगण्यात आले.

सध्या थंडीचा कालावधी सुरू झालेला असून शेतमाल दिवसभर सुकायला टाकला तरी त्यातील आर्द्रता कमी होत नाही. शासकीय खरेदीसाठी काही विशिष्ट मर्यादेपर्यंत आर्द्रता हवी असते. नेमकी येथेच शेतमाल विकताना अडचण तयार होत आहे. यावर्षी खरिपात अतिपावसामुळे मूग, उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. ५० टक्क्यांवर शेतमाल खराब झालेला होता. ज्यांना चांगल्या प्रतिचा शेतमाल झाला अशा धान्याला दर मिळत आहे. शेतमाल विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवलेली असून त्यांना खरेदी केंद्राद्वारे संदेश दिले जात आहेत. असे शेतकरी केंद्रावर जाऊन मालाचे नमुने दाखवतात. नमुने निकषात बसत असतानाही मोजमापाच्यावेळी पुन्हा अडचणी येत आहेत. प्रामुख्याने आर्द्रतेचा मुद्दा मारक झालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होत असून आर्थिक फटकाही बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
पिवळ्या पर्णछत्राची समस्या, कारणे जाणून...पावसाळा सरल्यानंतर थंडी पडली की बऱ्याच बागांमध्ये...
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी ...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
असे करा रुगोज चक्राकार पांढरी माशीचे...थंडी वाढू लागल्यानंतर कडाक्याच्या थंडीला सुरुवात...
नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ९७१ कोटींची...नगर ः जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडे ९७१...
खानदेशातील ‘रब्बी’ला ढगाळ वातावरणाचे...जळगाव : खानदेशात यंदा हुडहुडी भरविणारी थंडी दोन-...
उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम...औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन,...
फुलकिड्यांच्या प्रादुर्भावामुळे काजू...सिंधुदुर्ग : ढेकण्या, शेंडेमर, फांदीमर रोगांमुळे...
दहा वर्षांत सातारा जिल्ह्यातील १३८०...सातारा  ः जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी...
मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तननगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने...
पुणे कृषी महाविद्यालयातील ...पुणे  ः विद्यार्थी वसतिगृहाचे प्रवेशद्वार...
भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ८५ टक्के पाणीपुणे  : जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात यंदा दमदार...
हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत...हिंगोली : पाऊस लांबल्यामुळे हिंगोली, नांदेड,...
शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी...नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि...
कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान...गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत...
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून...नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी...
धान खरेदी केंद्रासाठी शेतकऱ्यांचा...भंडारा  ः गेल्या दोन महिन्यांपासून बंद...
काँग्रेसचा दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’ मुंबई  : विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या...
मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने...मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
महाविकास आघाडीची समन्वय समिती होणार...मुंबई  ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच...