agro agriculture news marathi ; Sharad Pawar met the farmer's son through Grasp painting | Agrowon

ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून शेतकरीपुत्राने साकारले शरद पवार

जगदीशचंद्र जोशी
रविवार, 15 डिसेंबर 2019

शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब) या गावी मंगेश निपाणीकर या शेतकरीपुत्राने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (१२ डिसेंबर) अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मंगेश निपाणीकर यांनी निपाणी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच सुरेश आणि शरद पाटील निपाणीकर या दोन भावांच्या साडेचार एकर क्षेत्रावर हरभरा, आळीव, मेथी, ज्वारी, गहू या पिकापासून ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साकारले आहेत.

शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब) या गावी मंगेश निपाणीकर या शेतकरीपुत्राने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (१२ डिसेंबर) अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. मंगेश निपाणीकर यांनी निपाणी येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच सुरेश आणि शरद पाटील निपाणीकर या दोन भावांच्या साडेचार एकर क्षेत्रावर हरभरा, आळीव, मेथी, ज्वारी, गहू या पिकापासून ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साकारले आहेत.

आजपर्यंत आपल्या नेत्याबद्दल प्रेम व्यक्त करणारे अनेक कार्यकर्ते आपण पाहिले असतील. पण मंगेशच्या या कल्पनेने सगळेच भारावून गेले आहेत. मंगेशने सातत्याने पंधरा दिवस राबून शरद पवार यांचे ग्रास पेंटिंग साकारले. विशेष म्हणजे हे जगातील सगळ्यात मोठे ग्रास पेंटिंग आहे. ‘शरद पवार यांनी आपल्या बांधावर यावे’, हीच या शेतकरीपुत्राची व ग्रामस्थांची इच्छा आहे.

‘साहेब, आम्ही आपली आतुरतेने वाट पाहतोय,’ अशी साद शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यामार्फत या तरुणाने घातली आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी आणि या कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी श्री. पवार मंगळवारी (ता. १७) निपाणी येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सरपंच सुरेश पाटील निपाणीकर यांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...
दर्जेदार केळी उत्पादनाचे तंत्रकेळी घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड...
पुरंदर तालुक्यातून डाळिंबाची युरोपात...गुळुंचे, जि. पुणे : कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील...
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचा...कोल्हापूर : ‘रयत अ‍ॅग्रो’च्या कडकनाथ कोंबडीपालन...
द्राक्ष सल्ला : तापमानातील चढ-उताराचे...सध्याच्या तापमानाचा विचार करता द्राक्षबागेत...