agro agriculture news marathi ; Sir, please give the day electricity for agriculture ... | Agrowon

साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू होताच ग्रामीण भागात वीज भारनिमयन सुरू झाले. शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मूर्तिजापूर तालुक्यातील कुरणखेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी १० अशी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर राबल्यानंतरही पाणी द्यायला शेतात जावे लागते. 

अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू होताच ग्रामीण भागात वीज भारनिमयन सुरू झाले. शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मूर्तिजापूर तालुक्यातील कुरणखेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या ठिकाणी रात्री १२ ते सकाळी १० अशी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर राबल्यानंतरही पाणी द्यायला शेतात जावे लागते. 

सध्या रब्बी पिकांची पेरणी, कुठे सिंचनाचे काम सुरू झालेले आहे. शेतकरी यासाठी दिवसभर शेतात काम करीत असतो. मात्र, वीज नसल्याने त्याला रात्री जागरण करीत हरभरा, गहू या पिकांना पाणी द्यावे लागते आहे. रात्रभर शेतात उभे राहावे लागते. सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्रीच्या वेळी धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीज पुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत. 
 

दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री, कडाक्याच्या थंडीत आम्हाला हरभऱ्याला पाणी द्यायला जावे लागते. सरकारने शेतकऱ्यांना १२ तास वीज दिली पाहिजे.
- पद्‌माकर कोगदे,  शेतकरी

कुठलाही राजकीय नेता, शासकीय अधिकारी आठ तासांपेक्षा अधिक काम करीत नाही. मात्र दिवसभर शेतात राबूनही शेतकऱ्याला रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, विंचू दंश होत असतो. 
- कुणाल राठोड, शेतकरी

शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीबेरात्री जावे लागणार नाही. शेतकरी हा सुद्धा माणूस आहे, याचे भान वीज कंपनीने ठेवायला हवे. 
- चंद्रशेखर गवळी, अकोला जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  


इतर बातम्या
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा...जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
निवृत्तीनाथ वारी ठरली ‘निर्मलवारी’नाशिक  : त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...
व्हिडिओतील छेडछाड भोवली; प्रभारी सहकार...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सापडलेले पाच हजार रुपये शेतकऱ्याने केले...सातारा ः सामाजातील प्रामाणिकपणा हरवत चालला...
नगराध्यक्षांची निवड नगरसेवकांमधून...मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या...
सातारा जिल्ह्याच्या विकासात सर्वांनी...सातारा  : चालू आर्थिक वर्षात विविध...
सावकारांकडे गहाण ठेवलेले सोन्याचे...अकोला ः वर्षानुवर्षे सावकारांकडे गहाण पडून असलेले...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
कृषिमंत्री पाठविणार चार हजार सरपंचांना...मुंबई : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक...
बाजार समित्यांत शेतकऱ्यांना थेट मतदान...मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
अनिल कवडे सहकार; सौरभ राव साखर आयुक्तमुंबई : अरविंद कुमार यांची ग्रामविकास विभागाच्या...