agro agriculture news marathi ; Soybeans reached 4100 in Akola | Agrowon

अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला शुक्रवारी (ता. १३) ४१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५२११ क्विंटलची आवक झाली होती. शेतकऱ्यांकडील सोयाबीन बऱ्याच अंशी विकून झालेले आहे. आता सोयाबीनच्या दरांमध्ये चकाकी वाढू लागली अन सोयाबीनला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोयाबीनला कमीत कमी २९०० व जास्तीत जास्त ४१०० रुपये दर मिळाला. तर ३९०० रुपये हा सरासरी दर होता. 

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला शुक्रवारी (ता. १३) ४१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. ५२११ क्विंटलची आवक झाली होती. शेतकऱ्यांकडील सोयाबीन बऱ्याच अंशी विकून झालेले आहे. आता सोयाबीनच्या दरांमध्ये चकाकी वाढू लागली अन सोयाबीनला यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोयाबीनला कमीत कमी २९०० व जास्तीत जास्त ४१०० रुपये दर मिळाला. तर ३९०० रुपये हा सरासरी दर होता. 

या वर्षी अतिवृष्टीने सोयाबीनसह सर्वच शेत मालाला फटका बसला. सोयाबीनचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घसरले होते. जो शेतमाल तयार झाला तो सुद्धा बहुतांश प्रमाणात काळवंडलेला तयार झाला. जे चांगल्या दर्जाचे सोयाबीन होते ते आधीच विक्री झाले. पाण्यामुळे काळे पडलेल्या शेतमालाला सुरुवातीच्या काळात कमी दराने खरेदी केले जात होते. आता शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपत आलेले असताना दर वाढू लागले आहेत. परप्रांतातील व्यापारी येथील सोयाबीनची खरेदी करण्यासाठी पुढे येत आहेत. यातून तयार झालेल्या स्पर्धेचा दरांवर परिणाम दिसू लागला.  

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४१०० रुपये क्विंटलने सोयाबीन विकले केले. सोयाबीनची आवक ५२११ क्विंटल झाली होती. अकोटसह पश्‍चिम विदर्भातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर चार हजारांपर्यंत पोचला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे. आणखी काही दिवस ही तेजी कायम राहण्याची शक्यताही सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली. 


इतर बाजारभाव बातम्या
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात बटाटा ८०० ते १८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता....
पुण्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...