सांगली जिल्ह्यात गहू, ज्वारीच्या पेरणीला वेग

सांगली जिल्ह्यात गहू, ज्वारीच्या पेरणीला वेग
सांगली जिल्ह्यात गहू, ज्वारीच्या पेरणीला वेग

सांगली  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग आला असून १ लाख १९ हजार ७७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पलूस आणि तासगाव तालुक्यात सर्वांत कमी रब्बीचा पेरा झाला आहे, तर ज्वारीची पेरणी ५७ टक्के झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ५१ हजार ४९८ हेक्टर आहे. गेल्या आठ दिवसांपासून पेरणीला गती आली आहे. जिल्ह्यात गव्हाची २० टक्के पेरणी झाली असून कडेगाव तालुक्यात गव्हाचे १ हजार ८९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जत तालुक्‍याचे सरासरी क्षेत्र ९४ हजार ५३५ हेक्टर असून ६१ हजार ७२८ हेक्टरवर पेरा झाला आहे.  या तालुक्यात रब्बी ज्वारीची सर्वाधिक पेरा झाला आहे. जत तालुक्यात सुर्यफुलाची २१६ हेक्टरवर लागवड झाली आहे. जत तालुक्यात प्रामुख्याने करडई पिक घेतले जाते. करडई पिकाचे सरासरी क्षेत्र २१२८ हेक्टर असून २७ हेक्टरवर पेरा झाला आहे.    सूर्यफूल, करडईचा पेरा होणार कमी जत तालुक्यात सूर्यफुलाचे ६१० हेक्टर आणि करडईचे २१२८ हेक्टर क्षेत्र आहे. ही पारंपरिक पिके या तालुक्यात घेतली जातात. परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून सुर्यफूल आणि करडईच्या क्षेत्रात घट होताना दिसते आहे. सध्या जरी या पिकांची पेरणी सुरू झाली असली, तरी सूर्यफूलाच्या क्षेत्रात २० टक्के आणि करडईच्या क्षेत्रात ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) मिरज ः १५ हजार ८१३, जत ः ६१ हजार ७२८, खानापूर ः ४ हजार ९६२, वाळवा ः २ हजार ५३२, तासगाव ः ५८०, शिराळा ः १ हजार ७६६, आटपाडी ः १० हजार ०२०, कवठेमहांकाळ ः १५ हजार ०९२, पलूस ः ५७१, कडेगाव ः ६ हजार ७०६, एकूण ः १ लाख १९ हजार ७७०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com