ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बातम्या
सुमन चंद्रा बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी रुजू
बुलडाणा : जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा महिला जिल्हाधिकारी मिळाल्या असून, सुमन चंद्रा यांनी हा पदभार स्वीकारला. सर्वप्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून येण्याचा मान डॉ. निरूपमा डांगे यांना मिळाला होता. श्रीमती सुमन चंद्रा २०१० च्या महाराष्ट्र कॅडेर मधील आयएएस अधिकारी आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर नंदुरबार येथे परिवीक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी २०१० मध्ये कार्यभार सांभाळला. त्यानंतर २०१२ मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केले. २०१७ पासून त्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या सह निवासी आयुक्त पदी कार्यरत होत्या.
जिल्ह्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना, उपक्रम, अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे, महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प असलेल्या जिगांवच्या निर्मितीवर विशेष लक्ष देऊन हा प्रकल्प विनाअडथळा पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला.
- 1 of 1501
- ››