'किसान सन्मान'ची यादीच तलाठ्यांनी दाखविली नाही

'किसान सन्मान'ची यादीच तलाठ्यांनी दाखविली नाही
'किसान सन्मान'ची यादीच तलाठ्यांनी दाखविली नाही

जळगाव  ः जिल्ह्यात केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीसंबंधी सुमारे एक लाख शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर चुकीची आहेत. आधार कार्डशी या नावांचा मेळ बसत नसल्याने यासंबंधी दुरुस्ती करायची आहे. परंतु ही दुरुस्तीची कार्यवाही तलाठ्यांच्या उदासीनतेमुळे झालीच नसल्याची माहिती आहे.  पोर्टलवर दुरुस्तीसंबंधी शेतकऱ्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांकडे पाठविली होती. ३० नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भातील नावांची दुरुस्ती, आधारबाबतची खात्री करून घ्यायची होती. परंतु अनेक भागात मागील शनिवारी तलाठी आपल्या कार्यालयात फिरकले नाहीत. तर काही ठिकाणी केवळ स्थानिक राजकारण, कामचुकारपणा यातून या याद्या शेतकऱ्यांना दाखविल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव या यादीत दुरुस्तीसाठी आले होते का? याची माहितीच अनेक भागात झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. किसान सन्मान निधीबाबत सरकार निधी पाठवित आहे. स्थानिक स्तरावर प्रशासन याबाबत जागरूकपणे शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोचविण्यासाठी काम करीत नसल्याची स्थिती आहे. यामुळे जिल्ह्यात तब्बल ७० टक्के शेतकरी या निधीच्या लाभापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारी वाढल्याने प्रशासनाने मध्यंतरी आढावा घेतला. त्यात शेतकऱ्यांची नावे, आधार क्रमांक यासंबंधी मेळ बसत नसल्याचे लक्षात आले. यानंतर याबाबतची दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले. हे आदेश देताना तलाठ्यांवर जबाबदारी निश्‍चित केली होती.  अनेक शेतकऱ्यांनी निधी मिळत नसल्याने संबंधित बॅंकेत चौकशी केली. आपल्या खात्यात पैसे आले आहेत का? याची माहिती घेतली. परंतु बॅंकेकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही. ज्या शेतकऱ्यांची बॅंक खाती जिल्हा बॅंकेत आहेत, त्यांच्या याबाबत अधिकच्या तक्रारी असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com