agro agriculture news marathi ; There should be no movement without 'clean and safe electricity stations' competition | Agrowon

‘स्वच्छ व सुरक्षित वीज उपकेंद्र’ स्पर्धा न राहता चळवळ व्हावी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

नाशिक : महावितरणच्या ग्राहकांना दैनंदिन वीजपुरवठा करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही विद्युत उपकेंद्राची असते. विद्युत उपकेंद्र हा यंत्रणेतील आत्मा असून अखंडित सेवेसाठी त्याची सातत्याने निगा राखणे महत्त्वाचे असून त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित उपकेंद्र ही स्पर्धा न राहता ती चळवळ व्हावी, असे प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले. 

नाशिक : महावितरणच्या ग्राहकांना दैनंदिन वीजपुरवठा करण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका ही विद्युत उपकेंद्राची असते. विद्युत उपकेंद्र हा यंत्रणेतील आत्मा असून अखंडित सेवेसाठी त्याची सातत्याने निगा राखणे महत्त्वाचे असून त्यामुळे स्वच्छ व सुरक्षित उपकेंद्र ही स्पर्धा न राहता ती चळवळ व्हावी, असे प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले. 

महावितरणच्या नाशिक परिमंडळ अंतर्गत ‘माझे उपकेंद्र - स्वच्छ व सुरक्षित उपकेंद्र’ या संकल्पनेतून ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र यांची अंतर्गत पायाभूत आराखडा विभागाच्या वतीने स्पर्धा घेण्यात आली होती. विद्युत भवन येथे मंगळवार (ता. ३) आयोजित सोहळ्यात गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री. जनवीर बोलत होते. यास्पर्धेत सहभागी झालेल्या आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपकेंद्र अंतर्गत अभियंते व यंत्रचालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सन्मानित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, प्रवीण दरोली, रमेश सानप, संजय खंडारे आणि सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) महेश बुरंगे उपस्थित होते.

अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी तर आभार सहाय्यक अभियंता नूतन गांगुर्डे यांनी मानले.

अशी करण्यात आली उपकेंद्रांची निवड 
उपकेंद्राच्या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती सोबतच सुरक्षितता सुद्धा अत्यंत महत्त्वाची असते. याच अनुषंगाने नाशिक परिमंडळातील ५ वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झालेले विद्युत उपकेंद्र यांनी सहभाग घेण्याबाबत पायाभूत आराखडा विभागाकडून सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेल्या विद्युत उपकेंद्राची पाहणी व मूल्यांकन निवड समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती. प्रोत्साहित करण्यासाठी सदर पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेतील विजेते उपकेंद्र 

  •  नाशिक शहर मंडळ 

प्रथम: मेरी, नाशिक शहर विभाग १,
द्वितीय: हिरापूर, चांदवड विभाग, 
तृतीय: अंबड ४, नाशिक शहर विभाग१ 

  •  मालेगाव मंडळ 

प्रथम: कालीकुट्टी, मालेगाव विभाग, 
द्वितीय:शिरूर, चांदवड विभाग

  •  नगर मंडळ

प्रथम: पेमगिरी, संगमनेर विभाग आणि पॉवर हाउस नगर विभाग संयुक्त
द्वितीय: शनिशिंगणापूर, (अहमदनगर ग्रामीण विभाग), 
तृतीय: लोणी, श्रीरामपूर विभाग यासोबत फिल्टर युनिट, श्रीरामपूर

  •  शिरूर उपकेंद्र, चांदवड विभाग यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. 

इतर बातम्या
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...