agro agriculture news marathi ; Will there be five rounds of irrigation for irrigation in Jalgaon district? | Agrowon

जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच आवर्तने मिळणार का?

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 डिसेंबर 2019

जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के पाऊस अधिक झाल्याने यंदा हिवाळ्यात मोठ्या धरणांतून सिंचनासाठी तब्बल पाच आवर्तने सोडण्याची शक्‍यता आहे. पाणी आरक्षणाबाबत दरवर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बैठक होत होती. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने टंचाई नाही. तसेच नवीन पालकमंत्री न मिळाल्याने जिल्ह्यातील पाणी आरक्षणाबाबत बैठक रखडली आहे. गेल्या वर्षापर्यंत दोन किंवा तीन वेळाच धरणांतून आवर्तने सोडली जायची. पाच वेळा पाणी सोडता येईल, एवढा साठा धरणात शिल्लक आहे. 

जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के पाऊस अधिक झाल्याने यंदा हिवाळ्यात मोठ्या धरणांतून सिंचनासाठी तब्बल पाच आवर्तने सोडण्याची शक्‍यता आहे. पाणी आरक्षणाबाबत दरवर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बैठक होत होती. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने टंचाई नाही. तसेच नवीन पालकमंत्री न मिळाल्याने जिल्ह्यातील पाणी आरक्षणाबाबत बैठक रखडली आहे. गेल्या वर्षापर्यंत दोन किंवा तीन वेळाच धरणांतून आवर्तने सोडली जायची. पाच वेळा पाणी सोडता येईल, एवढा साठा धरणात शिल्लक आहे. 

जिल्ह्याची पावसाची सरासरी ७०२.४ मिलिमीटर आहे. यंदा सरासरी पाऊस ९७२.२ मिलिमीटर झाला. तब्बल १३८ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यातील लहान- मोठे धरण, मध्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. यामुळे यंदा पाणीटंचाईची चिन्हे नाहीत. असे असले तरी मोठ्या धरणांतील पाण्याचे आरक्षण पिकांसाठी किती टक्के, पिण्यासाठी किती टक्के ठेवायचे, याबाबत पाणी आरक्षणाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन घेते. तीत संभाव्य पाणीटंचाईबाबत अहवाल मागून त्यावर किती निधीची तरतूद करायची, कोणत्या उपाययोजना करावयाच्या या बाबींवर विचारविनिमय करून टंचाई आराखडा तयार करायचा असतो. धरणांतील साठ्याची उपलब्धता, किती वेळा आरक्षण सोडले, तर किती टक्के साठा शिल्लक राहतो, पिण्यासाठी पाणी धरणात जुलैअखेर राहील याची काळजी घेऊन सिंचनासाठी आवर्तन सोडण्याचे नियोजन केले जाते. 

यंदा, मात्र डिसेंबर उजाडला, तरी पाणी आरक्षणाची बैठक झालेली नाही. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, तरी पालकमंत्रिपदांचे वाटप झालेले नाही. यामुळे जळगाव जिल्ह्यालाही पालकमंत्रिपद मिळालेले नाही. येत्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्री जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर पाणी आरक्षणाची बैठक होईल, तेव्हाच पाणी आरक्षण ठरेल. 


इतर बातम्या
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...