झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्षांची आढावा बैठक

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आढावा सभा
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आढावा सभा

अकोला ः आगामी  जिल्‍हा परिषद व त्‍या अंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्‍या सार्वत्रिक निवडणूकाबाबत माहिती देण्यासाठी प्रभारी जिल्‍हाधिकारी  नरेंद्र लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अति. जिल्‍हा सूचना व विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तसेच मुकेश मुरूमकार, नितीन सांगोळे, आस्तिक चव्हाण, प्रमोद देडंवे, सिध्दार्थ शिरसाठ, माधव मानकर, अभिमन्यु नळकांडे, विजय फुकट, राजेंद्र पातोंडे, एस. एस. चौधरी, राजू गांवडे, कपील रावदेव आदी राजकीय पक्षांचे  पदाधिकारी, प्रतिनीधी उपस्थित होते. जिल्‍हा परिषद पंचायत समीती अधिनियम तरतुदीविषयक बाबींबाबत, नामनिर्देशनपत्रा संबंधित आवश्‍यक माहिती, ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता, निवडणुकीची संक्षिप्‍त प्रक्रिया व राज्‍य निवडणूक आयोगाचे प्राप्‍त निर्देशाबाबत माहिती या वेळी देण्यात आली.  नामनिर्देशनपत्रासाठी मत्ता व दायीत्‍व, गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमीचे शपथपत्र, नोटरी स्‍टॅम्‍प, २००१ नंतर दोन पेक्षा जास्‍त अपत्‍य नसल्‍याचे शपथपत्र, शौचालय वापराबाबतचे ग्रामसभेच्‍या ठरावासोबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, राखीव जागा असल्‍यास जातीचे प्रमाणपत्राची प्रत, जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रत नसल्‍यास हमीपत्र व सादर केल्‍याची पोच, जिल्‍हा परिषदेसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला एक हजार रुपये व  राखीव उमेदवाराला ५०० रुपये अनामत रक्‍कम तर पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत सर्वसाधारण उमेदवाराला ७०० रुपये व राखीव उमेदवाराला ३५० रुपये अनामत रक्‍कम भरणे आवश्यक आहे. स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणे आवश्‍यक आहे, अशी नामनिर्देश पत्राबाबत माहिती देण्‍यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com