जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१) हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
1800 to 2600 for green chillies in Jalgaon
1800 to 2600 for green chillies in Jalgaon

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१) हिरव्या मिरचीची १८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २४०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागांतून होत आहे. 

बाजारात मंगळवारी  मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल १००० ते १२०० व सरासरी ८०० रुपये दर मिळाला. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. दर ३२०० ते ५२०० व सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. भरताच्या वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. या वांग्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २२०० व सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  

गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते ४००० व सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.  

भेंडीची २४ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० व सरासरी १००० रुपये दर होता. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १८०० रुपये दर मिळाला.

दोडक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५५० ते २५५० व सरासरी १९०० रुपये दर होता. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १८०० ते २८०० व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४४०० व सरासरी ३४०० रुपये दर मिळाला. 

काशीफळांची २७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ६०० ते ९०० व सरासरी ७०० रुपये दर मिळाला. लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १६००ते २६०० व सरासरी २००० रुपये दर होता. कोबीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १७०० ते २७०० व सरासरी २१०० रुपये, असा होता. 

शेवगा शेंगांना १५०० रुपये 

भोपळ्याची १४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० व सरासरी १६०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० रुपये दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० व सरासरी १८०० रुपये दर होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com