अकोट बाजार समितीत कापूस दहा हजारांवर

अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा प्रति क्विंटल दर सरासरी दहा हजारांवर पोहोचला आहे. आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
 अकोट बाजार समितीत कापूस दहा हजारांवर
In Akot Bazar Samiti Cotton on tens of thousands

अकोला ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा प्रति क्विंटल दर सरासरी दहा हजारांवर पोहोचला आहे. आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगळवारी (ता. ४) या ठिकाणी सुमारे चार हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस विक्रीला आल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली. यंदाच्या हंगामात पावसाने कापसाच्या पिकाला मोठा फटका दिला आहे. काही भागांत कापसाचा दर्जा खालावला. सोबतच शेवटच्या टप्‍यात बोंड अळीनेही कापूस पोखरला. याचा एकूणच उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, चांगल्या कापसाचा दर आता वाढलेला आहे. सोमवारी (ता. ३) अकोट बाजार समितीत सरासरी १० हजार रुपये क्विंटल कापूस विकला गेला. १०४० रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला. या बाजार समितीत कापसाला चांगला दर मिळत असल्याने अकोल्यासह इतर जिल्ह्यातील कापूसही आता विक्रीसाठी अकोटमध्ये येऊ लागला आहे. पान ४ वर  परिणामी, येथील आवक दररोज वाढत आहे. मंगळवारी चार ते पाच हजार क्विंटलदरम्यान आवक झाल्याचे सांगितले जात आहे. येथे खुल्या पद्धतीने कापसाचा लिलाव केल्या जातो. अकोटमध्ये असलेल्या जिनिंगपैकी १० ते १२ जिनिंगधारक या बोलीमध्ये सहभागी होता. त्यामुळे कापूस खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या कापसाला दर योग्य प्रमाणात मिळू लागला आहे. नव्या वर्षात रुई खंडीचे भाव वाढल्याने कापसाचा दर दहा हजारांचा टप्पा पार करीत असल्याचे बाजारातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

१.१५ लाख क्विंटलपेक्षा अधिक उलाढाल कापूस पिकासाठी अकोटची बाजारपेठ वेगाने पुढे येऊ लागली आहे. या बाजार समितीत यंदा २१ ऑक्टोबरला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला गेला. तेव्हापासून आजवर सुमारे १.१५ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदीची उलाढाल झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कापसाच्या दरात तेजी सुरू झाली. या आठवड्यात ९००० वर दर पोहोचला. त्यानंतर नववर्षाच्या प्रारंभी हाच दर दहा हजार पार करून गेला. या ठिकाणी कापसाचे चुकारे वेळेत मिळत असल्याने विविध भागांतून दररोजची आवक वाढत चालली आहे.

प्रतिक्रिया बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळण्यासाठी खुल्या पद्धतीची लिलाव पद्धत आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाला त्यामुळेच उच्चांकी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना चुकाऱ्यांबाबतही काही अडचणी नसल्याने ओढा वाढतो आहे. शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासन योग्य ते प्रयत्न करीत आहे. -गजानन पुंडकर, मुख्य प्रशासक, बाजार समिती, अकोट

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.