जळगावात आल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये

जळगावात आल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये
जळगावात आल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.५) आल्याची ८५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० व सरासरी ३२०० रुपये दर मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसर, पाचोरा, एरंडोल व यावल भागातून त्याची आवक होत आहे. ती स्थिर असून, दरही महिनाभरापासून टिकून असल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीत लाल कांद्याची २८०० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ३५० ते ८७५ रुपये व सरासरी ६०० रुपये दर होता. वांग्यांची ३२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १५०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. पालकची चार क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १९००, गिलक्‍याची पाच क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० व सरासरी २०००, चवळीची सहा क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल २००० ते २५०० व सरासरी २२०० रुपये असा मिळाला.

हिरव्या मिरचीची ५१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ९०० ते १२०० व सरासरी १००० रुपये दर मिळाला. टोमॅटोची आवक ४० क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल ३०० ते ७०० व सरासरी ५०० रुपये राहिले. कोथींबीरची १३ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते ३००० व सरासरी २५००, बटाट्याची ३५० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४०० ते ७५० व सरासरी ५७५, गवारची तीन क्विंटल आवक, तर दर ३१०० रुपये असा मिळाला.

कोबीची १७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ९०० व सरासरी ६०० रुपये दर मिळाला. शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाला. मुळ्याची आवक तीन क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल १००० रुपये राहिले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com