औरंगाबादेत हिरवी मिरचीला ५५०० रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची ६७ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान तर सरासरी ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
In Aurangabad, green chillies cost Rs. 5500
In Aurangabad, green chillies cost Rs. 5500

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २४) हिरव्या मिरचीची ६७ क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला ५००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यान तर सरासरी ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्यांची ५३१ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४३ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचे सरासरी दर २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. टोमॅटोची आवक ६८ क्‍विंटल तर सरासरी दर १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला सरासरी ११५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. गाजराची आवक १३२ क्‍विंटल तर सरासरी दर १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर २२५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २३ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीला सरासरी ४७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

पत्ताकोबीची आवक ३२ क्‍विंटल तर सरासरी दर १७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ११ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबूला सरासरी २७५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे सरासरी दर २०० रुपये प्रतिशेकडा राहिले. ७७०० जुड्यांची आवक झालेल्या पालकचा दर १३० रुपये प्रतिशेकडा राहिला. ८७०० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबीरचे सरासरी ४५० रुपये प्रतिशेकडा राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याला सरासरी ६००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

पपईची आवक ५ क्‍विंटल तर सरासरी दर ६५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे सरासरी दर ५५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला सरासरी २६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. चवळीची आवक ५ क्‍विंटल तर सरासरी दर १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ क्‍विंटल आवक झालेल्या वालशेंगांना सरासरी १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची २७१ क्‍विंटल आवक झाली. या वाटाण्याचे सरासरी दर १९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ क्‍विंटल आवक झालेल्या मकाचे सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मोसंबीची आवक ४४ क्‍विंटल तर सरासरी दर २८५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. अंजिराची आवक ६ क्‍विंटल तर सरासरी दर ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com