राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपये

सांगली ः येथील शिवाजी मंडई गुरुवारी (ता.१३) काकडीची १०० पिशव्यांची (एक पिशवी २० किलोची) आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपये
Cucumber in the state 500 to 3000 rupees

सांगलीत क्विंटलला १००० ते १५०० रुपये

सांगली ः येथील शिवाजी मंडई गुरुवारी (ता.१३) काकडीची १०० पिशव्यांची (एक पिशवी २० किलोची) आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस १०० ते १५० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

शिवाजी मंडईत वाळवा, मिरज, विटा तालुक्यातून आवक होते. संक्रांत सणानिमित्त काकडीची आवक कमी अधिक होत आहे. मंगळवारी (ता. १२) काकडीची ८० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १२० ते १७० रुपये असा दर मिळाला. बुधवारी (ता. ११) काकडीची १२० पिशव्यांची आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.  

मंगळवारी  (ता. १०) काकडीची १५० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर होता.  सोमवारी (ता. ९) काकडीची १०० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता.

जळगावात क्विंटलला १२०० ते २२०० रुपये

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) काकडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये व सरासरी १८०० रुपये मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, यावल, पाचोरा, औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव भागातून होत आहे. 

नाशिकमध्ये क्विंटलला १००० ते ३००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता.१२) रोजी काकडीची आवक ३०२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १,००० ते ३,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २,००० रुपये राहिला. बाजार समितीत सप्ताहाच्या सुरुवातीला आवक अधिक आहे. त्यामुळे दरात कमी राहिल्याचे दिसून आली; मात्र गेल्या दोन दिवसांत आवक कमी झाल्याने दरात सुधारणा होत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवारी (ता.११) काकडीची आवक ४८६ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल १,००० ते १,७७५ असा दर मिळाला. सोमवारी (ता.१०) काकडीची आवक ४५५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १,२५० ते २,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १,६५० राहिला. शनिवारी (ता.८) काकडीची आवक ७०० क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ६५० ते १,६०० असा दर मिळाला. शुक्रवारी (ता.७) काकडीची आवक ७०७ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल ६२५ ते १,८०० असा दर मिळाला. गुरुवारी (ता.६) काकडीची आवक ८५४  क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल५०० ते १,१२५ असा दर मिळाला.

सोलापुरात क्विंटलला १००० ते २५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची आवक जेमतेम राहिली. पण, मागणीतील सातत्यामुळे काकडीचे दर स्थिर राहिले. तिला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची आवक रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. गेल्या काही दिवसांत आवकेत घट होते आहे. पण, मागणी असल्याने दर टिकून आहेत. काकडीची सर्व आवक स्थानिक भागातूनच राहिली. काकडीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण काहीसे असेच प्रतिदिन २५ ते ५० क्विंटलपर्यंत होते. तसेच दरही टिकून होते. या सप्ताहात काकडीला प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.

अकोल्यात क्विंटलला १२०० ते १५०० रुपये

अकोला ः येथील भाजी बाजारात गुरुवारी (ता. १३) काकडीची सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. काकडीची स्थानिकसह इतर जिल्ह्यातून आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात  आले. 

सध्या येथील बाजारात काकडीची १५ ते २० क्विंटल आवक होत आहे. थंडीच्या दिवसांत काकडीला मागणी कमी राहते. बाजारात तरीही २० क्विंटलपर्यंत आवक झाली होती. ही काकडी स्थानिक भागातून अधिक प्रमाणात विक्रीला आली होती. गुरुवारी काकडी १२०० ते १५०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल दराने विकली गेली. तर काकडीची किरकोळ प्रतिकिलो विक्री २५ रुपयांपेक्षा अधिक दराने केली जात आहे. 

आठवडी बाजार बंद झाल्याने काकडीच्या उठावावर सध्या परिणाम होऊ लागला आहे. येत्या काळात आवक आणखी वाढू शकते, असेही व्यापारी सूत्रांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये क्विंटलला ८०० ते १००० रुपये 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) काकडीची ३९ क्विंटल आवक झाली. तिला ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान, तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये ७ जानेवारीला २८ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ जानेवारीला काकडीची आवक ३२ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ९ जानेवारी रोजी २९ क्विंटल आवक झालेल्या काकडीला ६५० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला. 

१० जानेवारी रोजी काकडीची आवक ४८ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ११ जानेवारी रोजी २४ क्विंटल आवक झालेल्या काकडीला सरासरी ६०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. १२ जानेवारी रोजी काकडीची आवक ३७ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रतिक्विंटल राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

परभणीत क्विंटलला  ५०० ते १२०० रुपये परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१३) काकडीची ६० क्विंटल आवक झाली. काकडीला प्रतिक्विंटल किमान ५०० ते  कमाल १२०० रुपये, तर ८५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून बोरवंड, सिंगणापूर, पेडगाव तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ, वसमत तालुक्यातील गावातून काकडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी काकडीची २० ते ६० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१३) काकडीची ६० क्विंटल आवक राहिली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com