नागपुरात तेजीच्या अपेक्षेने सोयाबीनची आवक मंदावली

नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीत आखडता हात घेण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे.
नागपुरात तेजीच्या अपेक्षेने  सोयाबीनची आवक मंदावली
Expect boom in Nagpur Soybean arrivals slowed down

नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून सोयाबीन विक्रीत आखडता हात घेण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक मंदावली आहे. कळमणा बाजार समितीत सद्यःस्थितीत सोयाबीनची दररोज अवघी एक हजार क्‍विंटल इतकीच आवक होत आहे. दर ४९०० ते ६४५१ रुपये आहेत. प्रक्रिया उद्योजकांकडून वाढती मागणी आणि तुलनेत आवक कमी त्यामुळे दर आणखी वधारण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. 

खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दरात तेजीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून पैशाची गरज असेल, तितकेच सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यात येत आहे. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक एक हजार क्‍विंटलवर स्थिरावली आहे. गेल्या आठवड्यात ८११ क्‍विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यानंतरच्या काळात १०७९ क्‍विंटलवर ही आवक पोचली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ४७०० ते ६३०० रुपये होते. या आठवड्यात हेच दर ४९०० ते ६४५१ रुपयांवर पोचले आहेत. 

बाजारात गव्हाची देखील नियमीत आवक आहे. गेल्या आठवड्यात गव्हाला १८०० ते २३०० रुपये असा दर होता. या आठवड्यात १८५० ते २१७० रुपयांवर हे दर पोचले. हरभऱ्याची देखील आवक होत असून ती २५६ क्‍विंटल आहे. 

संत्रा आवक नियमित 

बाजारात संत्र्यांची नियमित आवक होत आहे. गेल्या आठवड्यात २५०० क्विंटलपर्यंत मोठ्या आकाराची फळे येत होती. त्यात घट होत या आठवड्यात दररोज सरासरी १५०० क्‍विंटल मोठ्या आकाराची फळे बाजारात दाखल होत आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने फळांची आवक मंदावली आहे. मोठ्या आकाराच्या फळांना २००० ते २५००, मध्यम फळांना १६०० ते १८०० आणि लहान आकाराच्या फळांना ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. मोसंबीची आवक १५०० क्‍विंटलची आहे. त्यातील मोठ्या फळांचे व्यवहार २००० ते २६००, मध्यम १६०० ते १८०० आणि लहान फळांचे व्यवहार ११०० ते १२०० रुपये क्‍विंटलने होत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com