औरंगाबादमध्ये आठवड्यापासून मेथी, पालक, कोथिंबिर गायब

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये जवळपास आठवडाभरापासून मेथी, कोथिंबीर व पालक या पालेभाज्यांची आवक झाली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Fenugreek, spinach, kothimbir have been missing for weeks in Aurangabad
Fenugreek, spinach, kothimbir have been missing for weeks in Aurangabad

औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये जवळपास आठवडाभरापासून मेथी, कोथिंबीर व पालक या पालेभाज्यांची आवक झाली नसल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १८) हिरव्या मिरचीची १४५ क्विंटल आवक झाली. तिला किमान ८०० ते कमाल १६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ६१३ क्विंटल आवक झालेल्या कांद्याचे दर ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ५२ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ४०० ते ६०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. १३५ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ३०० रुपये राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या गवारीचे दर १००० ते १५०० रुपये, ६८ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

भेंडीची १३ क्विंटल आवक झाली. तिला किमान १००० ते कमाल १४०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. कोबीची आवक ७८ क्विंटल, तर दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ९३ क्विंटल आवक झालेल्या लिंबांना २००० ते २८०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. ४५ क्विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ६०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. १५ क्विंटल आवक झालेल्या पपईला ६०० ते १२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ५ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याचे दर ३०० ते ७०० रुपये राहिले. 

ढोबळ्या मिरचीची आवक ३४ क्विंटल, तर दर किमान ६०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ११४ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ६०० ते १४०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ५३ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ५०० ते १३०० रुपये दर मिळाला. १५ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबांचे दर ७०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या पेरूचे दर ५०० ते १००० रुपये प्रति क्‍विंटल राहिले.  संत्र्यांना ५०० ते ४५०० रूपये 

१४ क्विंटल आवक झालेल्या संत्र्यांना ५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४१० क्‍विंटल आवक झालेल्या टरबूजांचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ६४ आवक झालेल्या खरबुजांना ८०० ते ११०० रुपये दर मिळाला. ५०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल राहिले. द्राक्षाची आवक ७१ क्विंटल, तर दर १२०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com