नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर घसरले

नाशिक : येथील बाजार समितीमध्येवालपापडी-घेवड्याची आवक ८,३८६ क्विंटल झाली. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,२००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला.
Ghewadya in Nashik Increase in income; Rates dropped
Ghewadya in Nashik Increase in income; Rates dropped

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक ८,३८६ क्विंटल झाली. घेवड्याला प्रतिक्विंटल २,००० ते ३,२००, तर सरासरी दर २,५०० रुपये राहिला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत २ हजार क्विंटलची आवकेत वाढ दिसून आली.  घेवड्याचे सरासरी दर ७५० रुपयांनी कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक ८, ८९७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते २,२०० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६,७७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते २,०००, तर सरासरी दर १,४०० रुपये राहिला. लसणाची आवक ५०३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २,५०० ते ६,१००, तर सरासरी दर ४,५०० रुपये राहिला. 

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक सर्वसाधारण आहे. हिरव्या मिरचीची आवक २८५ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल १,२०० ते २,५००, तर सरासरी दर १,८०० रुपये दर राहिला. वाटाण्याची आवक ३४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ९,००० ते १४,०००, तर सरासरी दर १०,००० रुपये राहिला. गाजराची आवक ३,९५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,५०० ते ३,०००, तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,१००, तर सरासरी ७५०, वांगी १५० ते ४००, तर सरासरी २७५ व फ्लॉवर ६० ते १७०सरासरी १२५ रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १०० ते ११००, तर सरासरी७५० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ७००, तर सरासरी दर ५०० रुपये, असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यात भोपळा ५० ते १२५, तर सरासरी ८०, कारले  १०० ते २००, तर सरासरी १५०, गिलके २५० ते ३७५ तर सरासरी ३०० व दोडका ३५० ते ५००, तर सरासरी दर ४२५ रुपये असे प्रति १२ किलोस मिळाले. फळांमध्ये डाळिंबांची आवक ४,५५४ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४५० ते ११,२५०, तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला. केळीची आवक ८१४ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १,५००, तर सरासरी दर १,२५० रुपये मिळाला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com