नागपुरात सोयाबीनच्या आवकेत वाढ

दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना बाजारातील सोयाबीनची आवक गेल्या आठवड्यात मंदावली होती. परंतु दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपुरात सोयाबीनच्या आवकेत वाढ
Increase in soybean import in Nagpur

नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना बाजारातील सोयाबीनची आवक गेल्या आठवड्यात मंदावली होती. परंतु दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५०० क्विंटलची सरासरी आवक असताना या आठवड्यात ती १५०० क्विंटलवर पोहोचली आहे. दर ४८०० ते ६४५० रुपये आहेत.

खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु दरात तेजीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून पैशाची गरज असेल तितकेच सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यात येत होते. त्यामुळे बाजारातील सोयाबीनची आवक ५०० क्‍विंटलवर स्थिरावली होती. गेल्या आठवड्यात ५०१ क्‍विंटल सोयाबीनची आवक झाली. परंतु दर अपेक्षितरित्या सुधारले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या ५०१ क्विंटल वरून १०४७, ११४१ व आता १५८५ क्‍विंटलवर बाजारातील आवक पोचली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ५००० ते ६३०० रुपये होते. या आठवड्यात हेच दर ४८०० ते ६४५० रुपयांवर पोचले आहेत. व्यापाऱ्यांकडून मात्र यापुढील काळात सोयाबीन दरात सुधारणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

बाजारात गव्हाची देखील नियमीत आवक आहे. गेल्या आठवड्यात गव्हाला १८४० ते २१०२ रुपये असा दर होता. या आठवड्यात १८८६ ते २१४० रुपयांवर हे दर पोचले. गव्हाची आवक २०० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. तांदूळ आवक १०० क्‍विंटल तर दर ४५०० ते ४८०० रुपये असे होते. बाजारात हरभऱ्याची देखील आवक होत असून ती १०९ क्‍विंटल आहे. ४००० ते ४६५१ या दराने हरभरा व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ४३५० ते ४४११ असा हरभऱ्याला गेल्या आठवड्यात दर होता. त्यामुळे हरभरा दर स्थिर राहतील, अशी देखील अपेक्षा आहे. तुरीच्या दरात किरकोळ घसरण अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात ६००६ ते ६२१६ रुपये असा तुरीचा दर होता या आठवड्यात दरात घसरण अनुभवण्यात आली. ५७०० ते ६००० रुपये याप्रमाणे तुरीला दर मिळाला. 

बाजारात संत्रा आवक नियमीत  बाजारात संत्र्याची नियमित आवक होत आहे.  ४००  क्विंटलपर्यंत मोठ्या आकाराची फळे बाजारात येत आहेत. मोठ्या आकाराच्या फळांना ३२०० ते ३६००, मध्यम फळांना २६०० ते ३००० आणि लहान आकाराच्या फळांना २२०० ते २४०० रुपये क्‍विंटलचा दर मिळत आहे. बाजारातील मोसंबीची आवक १५०० क्‍विंटलची आहे. त्यातील मोठ्या फळांचे व्यवहार २२०० ते २६००, मध्यम १६०० ते १८०० आणि लहान फळांचे व्यवहार १४०० ते १६०० रुपये क्‍विंटलने होत आहेत.

सफरचंद तेजीत हिमाचल प्रदेश भागातून सफरचंदाची देखील  कळमना बाजार समितीत आवक वाढली आहे. सद्यःस्थितीत सरासरी १०० क्विंटल सफरचंद आवक होत असून गेल्या आठवड्यात ६००० ते ८००० असा दर सफरचंदाला होता. या आठवड्यात सफरचंदाच्या दरात घसरण होत हे दर  ४००० ते ६००० रुपयांवर आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.