कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस सुरुवात; दर स्थिर

कोल्हापूरबाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. गुळास प्रति क्विंटल ३५०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे.
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस सुरुवात; दर स्थिर
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस सुरुवात; दर स्थिर

कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून गुळाच्या आवकेत वाढ झाली आहे. बाजार समितीत दररोज पंधरा ते वीस हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. गुळास प्रति क्विंटल ३५०० ते ४३०० रुपये इतका दर मिळत आहे.  ऑक्टोबरच्या मध्यात झालेल्या पावसाने गुळाची आवक थंडावली होती. आता ती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. दिवाळी झाल्यानंतर गुळाच्या आवकेत वाढ सुरु झाली. सध्या ऊस प्लॉट वाफसा स्थितीत आल्याने गुळासाठी उसाची तोडणी वेगात सुरु आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत सुमारे दोनशे गुऱ्हाळघरे सुरू झाली आहे. ऑक्टोबरमध्ये राधानगरी, पन्हाळा तालुक्‍यात मोजकीच गुऱ्हाळे सुरू होती. पावसाने त्यातही व्यत्यय आला. ऑक्‍टोंबर शेवटच्या आठवड्यात केवळ एक ते दोन हजार गूळ रवेच बाजार समितीत येत होते. दिवाळी सणानंतर बहुतांशी भागातील मजूर गुऱ्हाळघरांवर दाखल झाले. यानंतर गूळ हंगामास वेग येत असल्याचे गुऱ्हाळ घर मालकांनी सांगितले.

गुळाचे असे आहेत दर (प्रति क्विंटल/रुपयांत)
एक किलोच्या बॉक्‍सला ३००० ते ४२०० 
स्पेशल गूळ रवे  ४२०० ते ४५००
पहिला दर्जा ३९०० ते ४१००
दुसरा दर्जा  ३५०० ते ३८००
तिसरा दर्जा ३००० ते ३५००
चौथा दर्जा २७०० ते ३०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com