
नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्याची ११५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ६००० असा दर होता. त्यास सरासरी दर ४००० राहिल्याची माहिती मिळाली.
बाजारात फ्लॉवरची आवक २१३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६४० ते १५०० दर होता. सरासरी दर १२८० राहिला. कोबीची आवक २०० क्विंटल झाली. तिला सरासरी ६७० ते १५९० असा दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिले. ढोबळी मिरचीची आवक १३३ क्विंटल झाली. तिला ३२५० ते ४३७५ दर होता. सर्वसाधारण दर ३६८७ राहिला. पिकॅडोरची आवक ४२ क्विंटल झाली. तिला २५०० ते ५००० दर होता. सर्वसाधारण दर ३७५० राहिला.
भोपळ्याची आवक ६४८ क्विंटल झाली. त्यास २६५ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ६०० राहिला. कारल्याची आवक १०६ क्विंटल झाली. त्यास ३२५० ते ५००० असा दर मिळाला.
सर्वसाधारण दर ३५४१ राहिला. दोडक्याची आवक २८ क्विंटल झाली. त्यास ३९५८ ते ६६६६ असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ५२५० राहिला. गिलक्याची आवक ३६ क्विंटल होती. त्यास २०५० ते ४१६५ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३१६५ राहिला. भेंडीची आवक ३७ क्विंटल झाली. त्यास १६८० ते ३५२५ दर होता.
सर्वसाधारण दर ३००० राहिला. गवारीची आवक ८ क्विंटल झाली. तिला २५०० ते ५००० असा दर होता. सर्वसाधारण दर ४००० राहिला. डांगराची आवक ३५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १२०० दर होता. सर्वसाधारण दर १००० राहिला.
काकडीची आवक ७५३ क्विंटल झाली. तिला ८५० ते २००० असा दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. लिंबूची आवक ११ क्विंटल झाली. त्यास १२०० ते ३२२५ असा दर होता. सर्वसाधारण दर २८०० राहिला. बटाट्याची आवक १९१५ क्विंटल झाली. त्यास ५५० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. सर्वसाधारण दर ९०० रुपये होता.
लाल कांद्याची आवक २१०४ क्विंटल झाली. त्यास ४५० ते १३५१ दर होता. सर्वसाधारण दर ६५० राहिला. लसणाची आवक १०३ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर २५०० ते ११००० दरम्यान होता. सरासरी दर ८००० राहिला.
फळांमध्ये पेरूची आवक १० क्विंटल झाली. त्यास १२५० ते २२५० दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. डाळिंबाची आवक ७६६ क्विंटल झाली. त्यास ५०० ते ६००० दर होता. सर्वसाधारण दर ३२५० राहिला. काही भाज्यांच्या आवकेप्रमाणे दरामध्ये चढ-उतार झाल्याचे दिसून आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.